CNG Bike : आता नाही लागणार पेट्रोल आणि वीज ! बाईक धावेल सीएनजीवर, बजाज करणार सीएनजी बाईक लॉन्च

Ajay Patil
Published:
Bajaj CNG Bike

CNG Bike :- पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त प्रमाणात वाढल्यामुळे तसेच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे आता मोठ्या प्रमाणावर ग्राहकांचा कल वाढल्यामुळे अनेक ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामवंत कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे वळले असून ट्रॅक्टर पासून ते अनेक इलेक्ट्रिक स्कूटर,

दुचाकी तसेच चारचाकी वाहने हे इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये तयार केली जात आहेत. तसेच लवकरात लवकर हायड्रोजनवर चालणारी कार देखील बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे. अगदी याच पार्श्वभूमीवर जर आपण टू व्हीलर अर्थात दुचाकीचा विचार केला तर

वाहन निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य असलेली बजाज ऑटोने लवकरच टू व्हीलर सेगमेंटमध्ये सीएनजी बाईक्स आणण्याची तयारी करत असून लवकरच सीएनजी बाईक आपल्याला बघायला मिळेल. याबाबतीत बजाज कंपनीने दावा केला आहे की या सीएनजी दुचाकीमुळे पेट्रोल वरील खर्चात जास्त बचत होणार आहे.

बजाज करणार सीएनजी बाईक लॉन्च

याबाबतची अधिकची माहिती देताना बजाज कंपनीचे एमडी राजीव बजाज यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे की, बजाजच्या माध्यमातून सीएनजी बाईक लॉन्च केली जाणार असून ज्यांना पेट्रोलचे दर परवडत नाही असे लोक सीएनजी बाईक विकत घेऊ शकतात.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर सीएनजी बाईक ही लोकांसाठी एक आकर्षण व फायद्याचे ठरेल या शंकाच नाही. पेट्रोलचे सध्याचे दर पाहिले तर ते शंभर रुपयांच्या आसपास असून या पार्श्वभूमीवर सीएनजी बाईक ही खूप महत्त्वाची ठरणार आहे.

तसेच इंधनाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर लोकांचा कल आता इलेक्ट्रिक आणि इतर वाहनांकडे वळल्यामुळे वाहन निर्मिती क्षेत्रातल्या अनेक ऑटो कंपन्या देखील आता अशा वाहनांच्या उत्पादनामध्ये गुंतले आहेत. तसेच आता इलेक्ट्रिक बाइक्स मार्केटमध्ये आल्यामुळे शंभर सीसी सेगमेंट मधील ज्या काही दुचाकी आहेत त्यांना आता बरेच लोक टाळताना दिसून येत आहेत.

सीएनजी मुळे होईल 50% पर्यंत इंधनाची बचत

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर हा एक चांगला पर्याय असल्यामुळे इंधन खर्चामध्ये 50 टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे. महत्वाचे म्हणजे ही सीएनची बाईक खरेदी आणि मायलेज या दोन्ही गोष्टींमध्ये खूप स्वस्त असणार आहे. बजाज ने सीएनजी बाईक लॉन्च केल्यानंतर ही भारतातील पहिली सीएनजी बाईक निर्मिती करणारी कंपनी ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe