कॉफीमुळे होतोय हा महत्वाचा फायदा !

Ahmednagarlive24
Published:

लंडन : शारीरिक थकवा दूर करून तरतरी आणणाऱ्या कॉफीचा आणखी एक लाभ समोर आला आहे. दिवसातून तीन ते पाच कप कॉफी पिल्याने यकृताच्या विविध आजारापासून मुक्ती मिळू शकते, असे एका ताज्या अध्ययनात आढळून आले आहे.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अध्ययनात असे आढळून आले की, कॉफी यकृताचा कर्करोग आणि सिरोसिससह यकृताशी संबंधित विविध आजारांसोबत लढण्यास मदत करते.

या अध्ययनाचे प्रमुख ग्रॅमे अलेक्झांडर यांनी सांगितले की, मागील काही वर्षांत जगभरात यकृताच्या आजारांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. अशा परिस्थतीत कॉफीमुळे या आजारांना रोखण्यात कशा प्रकारे मदत होऊ शकते, हे जाणून घेणे आवश्यक होते.

कॉफीचे योग्य प्रमाण दिवसातून तीन ते चार वेळा सेवन केल्यामुळे यकृताच्या कर्करोगाचा प्रभाव ४० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

इटली आणि अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या या अध्ययनानुसार, कॉफी यकृताच्या पेशींशी संबंधित सिरोसिसचा धोकासुद्धा २५ ते ७० टक्क्यांपर्यत कमी करू शकते. यकृताच्या आजाराची लक्षणे दिसत नसल्यामुळे त्याला ‘साइलंट किलर’ असे म्हणतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment