Dates for Strong Bones : हाडांना मजबूत करण्यासाठी रोज करा खजूराचे सेवन; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत !

Sonali Shelar
Published:
Dates for Strong Bones

Dates for Strong Bones : खजूरमध्ये प्रथिने, आहारातील फायबर, लोह आणि कर्बोदकांसारखे पोषक घटक आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. खजूरमध्ये मॅग्नेशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन बी6 आणि पोटॅशियम यांसारखे घटक आढळतात. खजूरमध्ये असलेले पोषक तत्व आपल्या शरीरासाठी देखील खूप महत्वाचे मानले जातात. खजूर खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. याशिवाय खजूर शरीरातील रक्ताची कमतरताही पूर्ण करते.

तसेच नियमित खजूरचे सेवन हाडे आणि स्नायू देखील मजबूत करतात. खजूरमध्ये मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी6 असते, जे हाडे मजबूत करण्याचे काम करतात. त्यामुळे खजूरचा आहारात समावेश करावा. आजच्या या लेखात आपण हाडे मजबूत करण्यासाठी खजूर कसे खावे? याबद्दल जाणून घेणार आहोत

मजबूत हाडांसाठी असे करा खजूराचे सेवन :-

-जर तुम्ही दररोज खजूर आणि दूध एकत्र सेवन केले तर तुमची हाडे मजबूत होतील. यासाठी तुम्ही एक ग्लास दूध घ्या. त्यात ४-५ खजूर घालून उकळवा. आता तुम्ही हे दूध रोज रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा. खजूरमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी6 आपल्या हाडांसाठी खूप महत्वाचे मानले जाते. त्याच वेळी, दूध देखील कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे. अशा स्थितीत रोज खजुराचे दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात.

-जर तुम्हाला दुधासोबत खजूर खायला आवडत नसेल तर तुम्ही पाण्यात भिजवून देखील खजूर खाऊ शकता. यासाठी तुम्ही ५-६ खजूर घ्या, रात्रभर ते पाण्यात भिजत ठेवा. आता सकाळी रिकाम्या पोटी खजूर खा. रोज सकाळी भिजवलेले खजूर खाल्ल्यास हाडे मजबूत होतात. याशिवाय खजूरमध्ये असलेले आयर्न देखील अ‍ॅनिमिया दूर करण्यास मदत करतात.

-तुम्ही बेसनाचे किंवा रव्याचे लाडू खाल्ले असतील. पण हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही खजुराचे लाडूही खाऊ शकता. खजूराच्या लाडूमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. खजूराचे लाडू सहज घरी बनवता येतात.

-तुम्ही रवा आणि गाजराचा हलवा खाल्ला असेल. पण हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही खजूरचे सेवन करू शकता. तुम्ही खजुराचा वापर खीरमध्ये देखील करू शकता. अशा परिस्थितीत जर तुम्ही रोज खजुराची खीर खाल्ली तर त्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात. याशिवाय सांधेदुखीतही खूप आराम मिळेल.

-जर तुमच्याकडे खजूर हलवा किंवा लाडू बनवायला वेळ नसेल तर तुम्ही थेट खजूर आणि मनुका एकत्र खाऊ शकता. यासाठी 4-5 खजूर आणि 5-6 मनुके घ्या. त्यांना रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी भिजवलेल्या खजूर आणि मनुका यांचे सेवन करा. रोज सकाळी रिकाम्या पोटी खजूर आणि मनुका खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe