गोरे होण्यासाठी तुम्हीही लावताय फेअरनेस क्रीम ? किडनी होऊ शकते खराब, वाचा त्याचे तोटे

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi News

Marathi News : महिला या त्यांच्या सौंदर्याकडे खूप लक्ष देत असतात. सुंदर दिसण्यासाठी त्या विविध उपायांचा अवलंब करत असतात. विविध घरगुती उपचार किंवा फेअरनेस क्रीम्सचा अवलंब करतात.

परंतु तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की या फेअरनेस क्रीम्समुळे किडनी खराब होऊ शकते. होय हे खरे आहे. चला जाणून घेऊयात याविषयी सविस्तर…

फेअरनेस क्रीममुळे किडनीचे नुकसान होते

जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार, पारायुक्त फेअरनेस क्रीम मूत्रपिंडास हानी पोहोचवू शकतात. डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की त्वचा उजळवणारे साबण आणि क्रीममध्ये पारा हा एक सामान्य घटक आहे. पारा अल्कली मेलेनिनची निर्मिती करतो.

परिणामी त्वचेचा रंग फिकट होण्यास मदत होत असते. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार “पारा असलेली त्वचा उजळवणारी उत्पादने आरोग्यासाठी हानिकारक आहेत आणि परिणामी अनेक देशांमध्ये त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अशी उत्पादने अजूनही ग्राहकांना उपलब्ध असून इंटरनेटवर त्यांची जाहिरात केली जाते.

मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली

मुंबईत काही महिन्यांपूर्वी फेअरनेस क्रीमबाबत धक्कादायक घटना समोर आली होती, त्यात फेअरनेस क्रीम लावल्याने एकाच कुटुंबातील ३ महिलांच्या किडनी खराब झाल्या होत्या. या तीन महिला ४ महिन्यांपासून फेअरनेस क्रीम वापरत होत्या आणि त्यांना ग्लोमेरुलोनेफ्राइटिस नावाचा आजार झाला.

आईसह दोन मुली ग्लोमेरुलोनेफ्राइटिसला पडल्या बळी

ग्लोमेरुलोनेफ्रायटिस हा एक आजार आहे ज्यामध्ये मूत्रपिंडाचे लहान फिल्टर खराब होतात. एकाच कुटुंबातील तीन महिलांना मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. अनेक चाचण्यांनंतर विद्यार्थिनीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना किडनीच्या समस्येला तिचे मेकअप किट जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या क्रीमसह विविध वस्तूंच्या चाचण्यांचे निकाल आल्याने डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. डॉक्टरांनी सांगितले की, मुलींच्या रक्तातील पारा ४६ होता, तर तो साधारणपणे ७ असावा लागतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe