अक्कलदाढ काढावीच लागते का? त्याचा अन बुद्धीचा काही संबंध असतो का? जाणून घ्या सर्व माहिती

Marathi News

Marathi News : अक्कलदाढ हा विषय नेहमीच सर्वांच्या उत्सुकतेचा भाग राहिला आहे. याचे कारण म्हणजे या दाढीविषयी असणारे समज गैरसमज. बऱ्याचदा अक्कल दाढीचा संदर्भ हा आपल्या अक्कलेशी अर्थात बुद्धिमतेशी जोडला जातो.

पण तुम्हाला माहितीये का, की अक्कलदाढ वयाच्या १६ ते १८ या काळात येते व या काळात साधणार कुणीही सज्ञान झालेला असतो त्यामुळे त्यामुळे जुन्या काळी त्याला अक्कलदाढ असे म्हणायचे. परंतु दंततज्ज्ञांनी दाढांचा आणि हुशारीचा काहीही संबंध नसतो हे स्पष्ट केले आहे.

अनेकांना होतो त्रास?

अनेकांना अक्कल दाढ येताना त्रास होतो. परंतु यातूनही अनेकांच्या अक्कलदाढ उगवतात. परंतु अनेकांना या दाढीचा भयानक त्रास होतो. अनेक वेळा या त्रासामुळे डॉक्टराकडे जावे लागते. अनेकदा डॉक्टर ती दाढ काढून टाकतात. पण हे लक्षात घ्या की ही दाढ काढल्यामुळे त्याचा मौखिक आरोग्यावर कुठलाही परिणाम होत नाही.

किती असतात अक्कल दाढा ?

सामान्यतः प्रत्येक व्यक्त्तीच्या जबड्यात चार अक्कल दाढा असून उजव्या आणि डाव्या बाजूस वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला अशा या चार दाढा येत असतात. काही वेळातर दाढा येत सुद्धा नाहीत. अनेकांमध्ये या दाढा काढून टाकल्या तर त्या व्यक्तीच्या डोळ्यावर परिणाम होतो, बुद्धी कमी होते आदी गैरसमज असल्याचे दंतरोग तज्ज्ञ सांगत असतात.

■ अक्कलदाढ कोणत्या परिस्थितीत काढली पाहिजे?

साधारण तीन स्थिती मध्ये अक्कलदाढ काढली पाहिजे असे जाणकार सांगतात.

– दाढ वेडीवाकडी उगत असेल तर

– अक्कल दाढेमुळे इतर दातांवर परिणाम होत असेल, चेहरा सुजत असेल तर

– असह्य वेदना होत असतील तर

अक्कलदाढ काढण्याचे साईडइफेक्ट?

अक्कलदाढ काढून टाकल्यानंतर सामान्यपणे काही धोके होत नाहीत असे तज्ज्ञ सांगतात. किरकोळ काही प्रकरणांत दातांमध्ये काही संसर्ग होऊ शकतात.खूप गरम अन्नपदार्थ किवा खूप कडक अन्नपदार्थ खाताना त्रास जाणवू शकतो असे म्हटले जाते.

डॉक्टर म्हणतात..-

एक प्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ म्हणतात की, १६ ते २८ या वयोगटादरम्यान अक्कलदाढ येत असते. जबड्याची पूर्ण वाढ झाल्यानंतरच या दाढा येतात. अनेकदा काहींच्या जबड्यात पुरेसे हाड उपलब्ध नसल्याने त्या तिरक्या होतात.

प्रत्येक अक्कलदाढ काढणे गरजेचे नसते आपण काही अक्कलदाढा त्वचा कापून वाचवू शकतो. काही वेळा तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्या काढाव्याही लागतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe