Grah Gochar 2024 : बुधला ग्रहांचा राजकुमार म्हंटले जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे. बुध हा नोकरी, व्यवसाय, बुद्धिमत्ता, शिक्षण आणि समृद्धीचा कारक मानला जातो.
मंगळवार, 20 फेब्रुवारी रोजी बुध मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. जेथे शनिदेव आधीच उपस्थित आहेत. अशा स्थितीत बुधाचे संक्रमण काही राशींसाठी विशेष मानले जात आहे. कोणत्या आहेत त्या राशी पाहूया…
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना कुंभ राशीत बुधाच्या संक्रमणाचा फायदा होणार आहे. या काळात वृषभ राशीच्या लोकंची आर्थिक स्थिती मजबूत होईल. यश मिळण्याची शक्यता आहे. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी देखील हा काळ उत्तम राहील.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना परदेश प्रवासाची संधी मिळेल. धार्मिक व अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. नातेवाईक आणि मित्रांकडून चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण खूप शुभ राहील. उत्पन्न वाढेल. विवाहाची शक्यता राहील. वैवाहिक जीवनासाठीही हा काळ शुभ राहील. तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळेल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल.
तूळ
तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात भरपूर फायदा होईल. संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होईल. समाजात समानता वाढेल. विद्यार्थ्यांसाठी काळ उत्तम राहील. काही चांगली बातमी मिळू शकते.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठीही हे संक्रमण अनुकूल राहील. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात लाभ होईल. ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल.
इतर राशींवरही परिणाम होईल
मीन, कन्या आणि कर्क राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. आरोग्याशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. पैशाचा खर्च वाढू शकतो. धनु, वृश्चिक, कुंभ आणि मेष राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण सामान्य राहील.