सूर्यफुलांच्या बिया खाल्ल्यास कॅन्सरसह ‘हे’आजार होतील बरे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :अनेक लोकांना सूर्यफुलांच्या बिया खाण्यासाठी आवडतात. या बियांपासून तेल बनतं, हे तेल आरोग्याला अतिशय उपयुक्त असतं. या बियांना आयुर्वेदातही महत्वाचे स्थान आहे. यांना अतिशय महत्त्वाचा दर्जा दिला गेला आहे. यात अनेक पोषक घटक असतात. या बिया शरीराला अनेक आजारांपासून देखील दूर ठेवतात. जाणून घेऊया फायदे-

 १) रक्तदाब नियंत्रण

सूर्यफुलांच्या बियांमध्ये मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत असतो. या स्त्रोताचा उपयोग रक्तदाब कमी करण्यासाठी होतो. एका संशोधनानुसार सूर्यफुलांच्या बियांमध्ये असलेले इतर पौष्टिक तत्वांच्या मदतीने मॅग्नेशियम रक्त वाहिन्यांना अरुंद करत रक्त प्रवाह नियंत्रित करतं यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत मिळते.

२) शुगर मेंटेन होण्यास मदत

  सुर्यफुलांच्या बियांमध्ये रक्तातली साखर कमी करणारं क्लोरोजेनिक अॅसिड असते. हे अॅसिड ज्या व्यक्तीच्या शरीरातील रक्तात जास्त साखर आहे ती कमी करून संभाव्य धोक्यांपासून बचाव करण्याचे काम करते.  जवळपास ३० ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने ६ आठवड्यांत १० टक्क्यांपर्यंत रक्तातली साखर कमी होऊ शकते.

३) हृदय रोगावर गुणकारी

सूर्यफुलांच्या बियांमध्ये फाइटोस्‍टरोल्‍सची मात्रा मोठ्या प्रमाणात असते, हा घटक हृदयाला स्वस्थ राखण्यास मदत करतो. या बियांमध्ये खास करून जीवनसत्त्व ‘ई’ आणि खनिज पदार्थांचा समावेश असतो. जीवनसत्त्व ‘ई’ मध्ये अँटी-इंफ्लामेट्री गुणांचा सुद्धा समावेश असतो जे हृदय रोगाच्या धोक्याला कमी करू शकतात.

४) हाडं बळकट राहतात

सूर्यफुलांच्या बियांचा अजून एक फायदा म्हणजे यामुळे हाडांचे आरोग्य सुद्धा ठीक राहते. सूर्यफुलांच्या बियांमध्ये मेद, खनिजे, जीवनसत्त्व आणि प्रथिने असतात जे हाडांना स्वस्थ बनवण्यासाठी मदत करतात.

 यात जीवनसत्त्व ‘ई’ आणि बी-कॉम्पलेक्स तसेच मॅग्नेशियमची मात्र मोठ्या प्रमाणावर असते, हे घटक ऑस्टियोपोरोसिस रूग्णांसाठी खूप लाभदायी असतात. ज्यांना हाडांची समस्या आहे किंवा तसा कोणता आजार आहे त्यांनाही डॉक्टर आवर्जुन सुर्यफुलांच्या बिया सेवन करण्याचा सल्ला देतात.

५) कॅन्सरचा धोका कमी होतो

सुर्यफुलांच्या बियांचा सर्वात मोठा अजून एक फायदा म्हणजे आपल्या शरीराला असणारा कॅन्सर अर्थात कर्करोगाचा धोका कमी होतो.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment