उद्या 2 सप्टेंबरपासून गणेश उत्सव सुरु होत असून हा उत्सव 12 सप्टेंबरपर्यंत राहील. सोमवारी घराघरात श्रीगणेशाची स्थापना केली जाईल. श्रीगणेश मूर्तीच्या सोंडसंदर्भात वेगवेगळे मतभेद आहेत.
उजव्या की डाव्या सोंडेचा गणपती शुभ राहतो याविषयी अनेक लोकांना माहिती नसावी. जाणून घ्या, घरातील श्रीगणेशाची सोंड डाव्या बाजूला असावी की उजव्या बाजूला.
घरासाठी जास्त शुभ ठरतो डाव्या सोंडेचा गणपती
घरामध्ये नेहमी डाव्या सोंडेची गणेश मूर्ती स्थापन करावी. घराच्या मुख्य दरवाजावर गणेश मूर्ती लावायची असल्यास त्या मूर्तीची सोंड डाव्या बाजूला असावी.
डाव्या सोंडेचा गणपती घरात असल्यास घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहते. अशाप्रकारच्या गणेश मूर्तीमुळे घरातील वातावरण संतुलित राहते.
वास्तुदोष दूर करण्यासाठी ब्रह्म स्थानावर ठेवावी गणेश मूर्ती
घरामध्ये मध्य भागाला ब्रह्म स्थान म्हणतात. या जागेचे कारक तत्त्व पृथ्वी आहे. घरामध्ये स्थापित गणेश मूर्ती पिवळ्या मातीची असल्यास हे अत्यंत शुभ राहते. घरामध्ये अशाप्रकारची डाव्या सोंडेची गणेश मूर्ती स्थापन केल्यास घरातील विविध वास्तुदोष नष्ट होतात.