श्रीगणेशाला वक्रतुंडही म्हटले जाते. या शब्दाचा अर्थ वळवलेली सोंड. श्रीगणेशाचे हेसुद्धा एक सुंदर स्वरूप असून यामध्ये यांची सोंड उजव्या किंवा डाव्या बाजूला वळलेली असते. सोमवार 2 सप्टेंबरपासून गणेश उत्सव सुरु होत असून हा उत्सव 12 सप्टेंबरपर्यंत राहील.
शास्त्रानुसार उजव्या बाजूला सोंड असलेले श्रीगणेश हट्टी स्वभावाचे असतात. यांचे पूजन कर्म सोपे नाही. अशाप्रकारच्या गणेश मूर्ती पूजेमध्ये कोणत्याही प्रकराची चूक होता कामा नये. अशाप्रकारच्या गणेश मूर्ती पूजेने श्रीगणेश उशिरा प्रसन्न होतात.
सामन्यतः उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा तंत्र विधीनुसार केली जाते. यांचा पूजन विधी अत्यंत कठीण असतो आणि यामुळे सामान्य लोकांना डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो.

