मस्तपैकी हैदराबादला फिरायला जा आणि स्वादिष्ट बिर्याणीचा आस्वाद घ्या! आणि त्यासोबत या ठिकाणांना नक्की भेट द्या

Ajay Patil
Published:
Picnic Spot

भारतामध्ये अशी अनेक शहरे आहेत की ते त्यांच्या अनोख्या वैशिष्ट्यांनी संपूर्ण भारतातच नव्हे तर जगात देखील प्रसिद्ध आहेत. अनेक शहरे हे त्या ठिकाणी असलेल्या खाद्य संस्कृती तसेच चाल रिती, अनेक प्रकारचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रसिद्ध पर्यटन स्थळे असल्याने स्थानिक शहरे हे वैशिष्ट्यपूर्ण रीतीने ओळखले जातात.

अगदी याच पद्धतीने जर आपण तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबाद या शहराचा विचार केला तर हे शहर अनेक प्रकारच्या ऐतिहासिक आणि  सांस्कृतिक चालरिती व स्थळांमुळे देखील प्रसिद्ध आहे.

खवय्यांसाठी तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खानपानाची रेलचेल दिसून येते. आपण हैदराबाद शहरामध्ये जर फिरायला जाल तर कोणत्या ठिकाणी किंवा कोणती पर्यटन स्थळे पहाल याबाबतची माहिती घेऊ.

 हैदराबाद शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1- चारमिनार चारमिनार हे हैदराबादचेच नव्हे तर संपूर्ण भारतात ओळखले जाते. बांधकाम साधारणपणे 1591 मध्ये झालेले असून ही चार मजली इमारत संपूर्ण इस्लामिक शैलीमध्ये बांधण्यात आली असून तुम्ही जर हैदराबाद फिरायला जाल तर चारमिनार पाहिल्याशिवाय तुमची हैदराबादची सहल पूर्ण होणारच नाही.

2- मक्का मस्जिद चारमिनार च्या अगदी जवळ मक्का मशीद असून तिचे बांधकाम मोहम्मद कुली कुतूब शहाने केले असून ते साधारणपणे चारशे वर्षांपूर्वी बांधली गेली आहे. या मशिदीमध्ये दहा हजार लोक एकाच वेळी नमाज पठण करू शकतात.

3- गोलकोंडा किल्ला ही एक महत्त्वाची ऐतिहासिक इमारत असून हैदराबाद शहराची एक ओळख आहे. गोलकोंडा किल्ल्याची इमारत अकराव्या शतकात बांधली गेली असून या ठिकाणी तुम्ही संध्याकाळी लाईट आणि साऊंड शो पाहू शकतात व हे या ठिकाणचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

4- रामोजी फिल्म सिटी- हैदराबाद पासून साधारणपणे 30 किलोमीटरवर रामोजी फिल्म सिटी असून या ठिकाणी हिंदी सिनेमांचे आणि इतर चित्रपटांचे चित्रीकरण म्हणजे शुटींग केले जाते. जगातील सर्वात मोठे स्टुडिओ कॉम्प्लेक्स असून हे ठिकाण सुमारे एकर मध्ये पसरलेले आहे.

5- हुसेन सागर तलाव- हा तलाव हैदराबाद आणि सिकंदराबाद जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. या तलावाची एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या अगदी मध्यभागी महात्मा बुद्धांची एक विशाल मूर्ती असून या ठिकाणी तुम्हाला बोट राईड आणि फेरी राइडचा अनुभव घेता येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe