अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- आज काल मोबाईल फोन हा जीवनाचा अविभाज्य घटक झालाय. एवढंच नाही तर तो प्रत्येकाच्या घरातला सदस्य झालाय. कारण या मोबाईलला काही बिघाड झाल्यास संपूर्ण घरवर एकप्रकारे शोककळा पसरते.
त्यातल्या त्यात या अँड्रॉइड मोबाईल्सच्या किंमती वाढल्याने आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब असलेल्या माणसाला इच्छा असूनही हा मोबाईल विकत घेता येत नाही.
मात्र अशा लोकांसाठी आणि हे ड्रॉइड मोबाईल वापरणाऱ्यांसाठी एक खुषखबर आहे. अँड्रॉईड मोबाईल चक्क ७ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहेत. सॅमसंग कंपनीने मागील आठवड्यात सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला. तसेच काही स्मार्टफोनच्या किंमतीदेखील घटवल्या. त्यामुळे हे स्मार्टफोन घेण्याची नामी संधी आहे.
यातील काही स्मार्टफोन तर चक्क ७ हजार रुपयांची स्वस्त झाले आहेत. सॅमसंग, Galaxy Z Flip, Galaxy Note 10 Lite सह अन्य स्मार्टफोनच्या किंमती कमी झाल्या आहेत. सॅमसंगने फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत ७ हजार रुपयांनी कमी केली आहे. या स्मार्टफोनची किंमत आता १ लाख १५ हजार ९९९ रुपयांवरून १ लाख ८ हजार ९९९ रुपये झाली आहे.
या फोनला दोन डिस्प्ले देण्यात आले आहेत. प्रायमरी डिस्प्ले ६ . ७ इंचाचा आणि सेकंडरी डिस्प्ले १ .१० इंचाचा आहे. सोबत १२ – १२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि १० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत कंपनीने ४ हजार रुपयांनी कमी केली आहे.
किंमतीत घट केल्यानंतर आता ६ जीबी रॅमच्या स्मार्टफोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅमच्या स्मार्टफोनची किंमत ४३ हजार ९९९ रुपये झाली आहे. यात ६ . ७ इंचाचा डिस्प्ले, १२ – १२ – १२ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा, ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि ४ हजार ५०० गॅलेक्सी सिरीजमधील Galaxy A51,
Galaxy A31, Galaxy A21s या स्मार्टफोनच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. Galaxy A51 ची किंमत १ हजार रुपये कमी करण्यात आली आहे. ८ जीबी रॅमच्या या फोनची किंमत आता २६ हजार ९९९ रुपये झाली आहे. Galaxy A31 या स्मार्टफोनची किंमतही १ हजार रुपये कमी करण्यात आली आहे.
६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज अशा एकाच व्हेरिएंटमध्ये येणाऱ्या या फोनची किंमत आता २० हजार ९९९ रुपये झाली आहे.
यासह Galaxy A21s च्या बेस मॉडेल (४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज) ची किंमत ५०० रुपये आणि टॉप मॉडेल (६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज) ची किंमत १ हजार रुपयांनी कमी केली आहे. यामुळे बेस मॉडेलची किंमत आता १५ हजार ९९९ आणि टॉप मॉडेलची किंमत १७ हजार ४९९ रुपये झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा