आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. असा सल्ला अनेकदा दिला जातो. त्यामुळे हृद्याचे आरोग्य सुधारते, रक्तप्रवाह सुरळीत राहतो तसेच हृद्यविकारांचा धोका कमी होतो. मग नेमक्या कोणत्या भाज्या तुमच्या हृद्याचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतील हे जाणून घेण्यासाठी नक्की पुढील स्लाईडवर क्लिक करा
मेथी – उंदरांवर केलेल्या प्रयोगानुसार, मेथीचा आहारात समावेश केल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. त्यामधील अॅन्टीऑक्सिडंट घटक हृद्याचे आरोग्य जपतात. त्यामुळे नाश्त्यामध्ये, जेवणात विविध स्वरूपात मेथीचा वापर करा.
पालक – पालकचाही आहारात समावेश करणं फायदेशीर ठरते. त्यामधील नायट्रेट ऑक्साईड हृद्याचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते. clinical nutrition research in 2015 च्या अहवालानुसार, पालकामध्ये नायट्रेट अधिक प्रमाणात असते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो, हृद्याच्या धमन्या कडक होण्याचा धोका कमी होतो.
भोपळी मिरची – यामधील phytochemical घटक तिखटपणा वाढवतात. तसेच शरीराचा मेटॅबॉलिक रेट सुधारायलाही मदत होते. TRPV1 नामक प्रोटीनला चालना देण्यासाठी मदत झाल्याने शरीराची व्हस्क्युलर हेल्थ सुधारते.
हिरव्या मिरच्या – भोपळी मिरची प्रमाणेच capsaicin घटक हिरव्या लहान मिरच्यांमध्येही आढळते. journal BMJ in the year 2015 च्या अहवालानुसार, तिखटाचे अधिक खाणार्यांमध्ये कॅन्सर,हृद्यविकार, श्वसनविकार यांचा धोका कमी होतो.त्यामुळे डाळ, आमटी, चाट अशांमध्ये आवर्जून बारीक चिरलेली मिरची अवश्य मिसळा.
ब्रोकोली – अनेकांनी यापूर्वी ब्रोकोली खाल्ली नसेल तर हृद्याच्या आरोग्यासाठी ब्रोकोली फायदेशीर आहे. journal Plant Food for Human Nutrition in 2010 च्या अहवालानुसार, ब्रोकोलीमुळे ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. हृद्याच्या धमन्यांचे आरोग्य जपण्यास मदत होते. त्यामुळे सलाड, सूपमध्ये ब्रोकोलीचा समावेश करा.
- फेब्रुवारी 2025 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ प्रलंबित मागणी पूर्ण होणार ! कर्मचाऱ्यांना मिळणार आर्थिक दिलासा
- फडणवीस सरकारचा ‘हा’ ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण, नव्या महामार्गामुळे 16 तासांचा प्रवास फक्त 8 तासात होणार, उद्घाटनाची तारीख काय ? वाचा…
- स्मार्टफोन,घरगुती उपकरणे स्वस्तात घेण्याची सुवर्णसंधी! कधी सुरू होत आहे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचा रिपब्लिक डे सेल?
- शेतकऱ्यांपासून तर सगळ्यांची आवडती असणारी हिरोची ‘ही’ बाईक झाली महाग! आता मोजावे लागतील इतके पैसे
- विनफास्ट भारतीय बाजारात आणणार 2 धमाकेदार इलेक्ट्रिक एसयुव्ही कार! मिळेल 430 ते 450 किमीची रेंज आणि बरच काही