अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-सध्या स्मार्टफोन वापर करत नाही असा व्यक्ती चुकूनच सापडेल. बरीच लोकांना दिवसभर मोबाईलवर विविध कामे करण्याची सवय असते.
जास्त झाल्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते. अशावेळी मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर काहींचा स्मार्टफोन लवकर चार्ज होत नाही.यासाठी काही टिप्स
१) खराब केबल – बऱ्याचदा खराब केबल किंवा चार्जर हे फोन कमी चार्जिंग होण्याचे कारण असू शकते. त्यामुळे बॅटरीही लवकर उतरते.
अशावेळी स्मार्टमान खराब झाला असं ग्रहित धरण्यापेक्षा अडेप्टर किंवा चार्जर बदलून पाहावा. शक्यतो स्मार्टफोनसोबत आलेल्या चार्चरनेच मोबाइल चार्ज करावा.
जर मोबाइलसोबत आलेला चार्जर खराब झाला असेल तर ओरिजनल चार्जर विकत घ्यावा.
२) पावर सोर्स – बऱ्याचदा चार्जिंगसाठी कुमकुवत पॉवर सोर्सचा वापर केला जातो. किंवा वायरलेस चार्जरचा वापर करत असाल तर तुम्हाला वायरवाला चार्जर वापरायची गरज आहे.
सॅमसंगसारख्या कंपनीचा वेगवान वायरलेस चार्जरसुद्धा रेग्यूलर चार्जरपेक्षा संथ गतीने मोबाइल चार्ज होतो.
३) रनिंग ऍप बंद करा बॅग्राऊंडला अॅप्लिकेशन सुरू राहिल्यास मोबाईलच्या मेमरीवरही जास्त भार येतो आणि बॅटरीही वापरली जाते. त्यामुळे आपले मोबाईलवरील काम झाले की रनिंग अॅप्लिकेशन क्लिअर करावं.
४) खराब यूएसबी पोर्ट – सर्व करूनही तुमचा फोन संथ गतीने चार्ज होत असेल तर तुमचा यूएसबी पोर्ट खराब झालेला असू शकतो. स्मार्टफोनच्या आधिककाळ वापर केल्यानंतर यूएसबी पोर्टमध्ये धूळ गेलेली असू शकते.
किंवा खराब झालेलं असू शकते. एकदा यूएसबी पोर्ट साफ करून घ्या. किंवा स्मार्टफोनच्या गॅलरीमध्ये दाखवून यूएसबी पोर्ट खराब झालं असेल तर रिप्लेस करा.
5) खराब बॅटरी – मोबाईलमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बॅटरी. बॅटरी संपली की मोबाईवर काहीच करता येत नाही.
सध्याच्या नव्या मोबाईलमध्ये आता लीथीयम आयन बॅटरीचा वापर केल्यानं आधीच्या तुलनेत ती जास्त टिकून राहण्यास मदत होते. मात्र काही गोष्टींची काळजी घेतली तर त्यांचं लाईफ आणखी वाढून उत्तम परफॉर्मेंस देऊ शकते
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com