Home Care Tips:- आपल्यापैकी प्रत्येकजण आपले स्वतःचे घर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते व त्या पद्धतीने स्वच्छ ठेवत देखील असते. यामध्ये मग घरातील अंतर्गत स्वच्छता असो किंवा घराच्या आजूबाजूचा परिसर असो तो स्वच्छ ठेवण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करतो. कारण घराची स्वच्छता ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाचे असल्यामुळे स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे आहे.
परंतु इतके करून देखील बऱ्याचदा घरामध्ये झुरळ, लाल मुंग्या आणि पाली यासारख्या कीटकांचा सुळसुळाट दिसून येतो. यामध्ये पाली या खूप घातक असतात व त्या विषारी असल्यामुळे जर एखाद्या वेळेस अन्नामध्ये पडली तर विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे घरामध्ये पाली असणे हे खूप धोकादायक ठरते. त्यामुळे पालींचा बंदोबस्त करता यावा याकरिता अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात.

तरीदेखील हव्या त्या प्रमाणामध्ये आपल्याला पालींचे नियंत्रण करता येत नाही.तसेच पालींचे नियंत्रण करण्यासाठीच्या अनेक व्हिडिओ देखील आपल्याला सोशल मीडियावर बऱ्याचदा दिसून येतात.
अगदी याच पद्धतीने एका इंस्टाग्राम अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आलेला असून यामध्ये तुरटीचा वापर करून मिनिटांमध्ये पाल कशी घरातून पळून जाते हे दाखवण्यात आलेले आहे. घरामध्ये पाल येऊ नये किंवा पालीला घरातून घालवता यावे याकरिता यामध्ये एक सोपा असा घरगुती उपाय सांगितलेला आहे.
स्वस्तातला हा घरगुती उपाय करा आणि पालींना पळवा
जर आपण या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पाहिले तर त्यामध्ये एका भांड्यामध्ये डासांची जी काही कॉइल असते ती घ्यावी आणि त्यासोबत तुरटीचा लहान खडा घ्यावा. हे घेतल्यानंतर एका ग्लास मध्ये पाणी घ्यावे व या पाण्यामध्ये तुरटी आणि डासांचा कॉईल एकत्र वाटून घ्यावा व त्याची पेस्ट तयार करून त्या पाण्यामध्ये ती पेस्ट टाकावी.
तसेच त्यामध्ये लाल मिरची घालावी व बेकिंग सोडा तसेच मीठ देखील टाकावे. त्यानंतर हे मिश्रण असलेले पाणी पाच मिनिटे चांगले उकळून घ्यावे व हे गरम केलेले पाणी थंड झाल्यावर एका स्प्रेच्या बाटलीमध्ये भरावे व घरामध्ये ज्या ठिकाणी पाल येते अशा ठिकाणी तो स्प्रे मारावा.
जर तुम्हाला समोर पाल दिसली तर तिच्या अंगावर या स्प्रेचा छिडकाव करावा. असे केल्यामुळे लागलीस पाल घराच्या बाहेर पळून जाते. अशा पद्धतीने तुम्ही ही सोपी घरगुती ट्रिक्स वापरून घरातील पाली सहजपणे पळवू शकतात.
पहा व्हिडिओ