माणसाला किती तासांची झोप आवश्यक असते? ‘या’ नव्या संशोधनाने आता सगळेच चक्रावले

Published on -

आपले आरोग्य हे झोपवर ठरते, असे म्हणतात. अपुरी झोप ही अनेकदा आजारांना निमंत्रण देते आणि आपले आयुष्य कमी होते, असे सांगितले जात होते. कमीत कमी आठ तासांची झोप हवी, असे विज्ञान सांगते. परंतु शास्त्रज्ञांनी मानवांमध्ये एक नवीन जनुक उत्परिवर्तन ओळखले आहे. यामुळे काही लोक फक्त ४ तासांच्या झोपेवरच जगू शकतात.

काय आहे शास्त्रज्ञांचा दावा?

संशोधकांनी मानवी सुपर-स्लीपरमध्ये एक उत्परिवर्तन ओळखले आहे. त्याला SIK3-N783Y असे शास्त्रीय नाव देण्यात आले आहे. झोपेपासून वंचित असलेल्या उंदरांवर चाचणी केल्यानंतर संशोधकांनी एका नवीन अभ्यासात SIK3-N783Y उत्परिवर्तनाचे वर्णन केले. हे उत्परिवर्तन काही दुर्मिळ माणसातही आढळले आहे. म्हणजेच हे जनुक ज्याच्यात आहे, त्या माणसाला अगदी चार तासांची झोपही पुरेशी आहे. चार तासांच्या झोपेत, तो अगदी ताजातवाणा होणार आहे.

नेमके काय म्हणाले शास्त्रज्ञ?

कॅलिफोर्निया विद्यापीठातील न्यूरोसायंटिस्ट आणि अनुवंशशास्त्रज्ञ यिंग-हुई फू यांनी नेचर यांनी याबाबत एक दावा केला आहे. ते म्हणतात की, “जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा आपले शरीर काम करत राहते. ते स्वतःला डिटॉक्सिफाय करते आणि नुकसान दुरुस्त करते. परंतु नैसर्गिकरित्या कमी झोपणारे लोक हे, जी गोष्ट आपले शरीर झोपेत करते, तेच यांचे शरीर जागेपणीही करु शकते.

किती झोप आवश्यक आहे?

पुरेशी झोप न घेतल्याने अनेक नकारात्मक परिणाम होतात. आळशीपणा आणि विसरण्याची भावना, हृदयरोगाचा धोका असे दुष्परिणाम कमी झोपेमुळे होतात. वयानुसार आपल्याला आवश्यक असलेल्या झोपेचे प्रमाण बदलते. परंतु बहुतेक प्रौढांना त्यांची सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी दररोज रात्री सात ते नऊ तासांची झोप आवश्यक असते. तथापि, जे लोक नैसर्गिकरित्या झोपतात ते कमी झोपेतही चांगले काम करतात. आता शास्त्रज्ञांनी शोधलेल्या या जनुकाचा उपयोग झोपेची समस्या असलेल्या लोकांना होईल, असेही काहींचे म्हणणे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe