अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- पाणी मनुष्यासाठीच नाही तर प्रत्येक जीवाच्या शरीरासाठी एक अनिवार्य पोषक घटक आहे. याच्या आवश्यकतेचं अनुमान आपण यावरूनच लावू शकतो की, आपण जेवणाशिवाय काही काळ जिवंत राहू शकतो पण पाण्याशिवाय नाही.
पाणी त्याच्या विशेष गुणांमुळे शरीराच्या पोषणात महत्त्वाची भूमिका बजावते. शरीराची निर्मिती आणि पोषणात पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. कोणताही असा आजार नाही, ज्यामध्ये पाणी पिणं वर्जित आहे.

काही परिस्थितीत पिलेलं पाणी आरोग्यासाठी लाभदायकच नाही तर थोडी-फार हानी पोहचवते. म्हणजे गडबडीत किंवा हसत-हसत किंवा बोलताना पाणी पिण्याने कधी कधी पाणी नाकातून बाहेर येते, ज्यामुळे नाकामध्ये काहीवेळ खवखवते.
जेवण करण्याआधी आणि भाजलेले-तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याने पचन क्रिया मंद होते. तर जेवणानंतर लगेच पाणी पिण्याने चरबी तर वाढतेच शिवाय ताकदही कमी होते.
स्निग्ध खाद्यपदार्थ, तळलेले खाद्यपदार्थ, लोणी, सुकामेवा आणि मिठाई खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याने खोकला येण्याची शक्यता असते.
तर उष्ण पदार्थ, काकडी, टरबूज, कलिंगड, मुळा, मका खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याने खोकला येण्याची शक्यता वाढते.
यामुळे शरीरातील र्नत लाल, पातळ आणि शुद्ध होते. तसं बघायला गेलो तर पाणी कधीही पिऊ शकतो, पण खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर पाणी पिण्याचे व़िशेष फायदे होतील.
सकाळी उठून चूळ भरून सगळ्यात आधी पाणी प्यायला हवं. मग तहान लागलेली असो अथवा नसो. सूर्योदयापूर्वी नियमित उठून पाणी पिण्याने अनेक जटिल समस्या दूर होतात आणि शरीर निरोगी रहाते.
झोपण्यापूर्वी पाणी पिण्याने झोप चांगली लागते. याउलट झोपून उठल्यानंतर लगेच पाणी पिण्याने आळस दूर होतो.
जेवणापूर्वी अर्धा तास आधी एक ते दोन ग्लास किंवा जेवण करताना मध्ये मध्ये दोन घोट पाणी पिणे खूप लाभदायक ठरते. कारण यामुळे जेवण पटकन पचते.
तसंच पचनशक्तीही वाढते. जेवण केल्यानंतर साधारण एक तासाने पाणी पिणे अतिशय लाभदायक ठरते. यामुळे पचनादरम्यान पौष्टिक घटक नष्ट होत नाही, ज्यामुळे शरीर बलवान होते.
खेळणे, व्यायाम व श्रम केल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. म्हणून यानंतर अर्धा तास आराम करावा व थोड्या वेळाने भरपूर पाणी प्यावं.
भीती, राग, मूर्च्छा, शोक आणि जखम झाल्यानंतर पाणी पिणे खूप लाभदायक ठरते. कारण यादरम्यान शरीराच्या अंतःस्त्रावी ग्रंथींद्वारे सोडलेल्या हार्मोन्सचा दुष्परिणाम एकदम कमी होतो.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम