तुम्हालाही निरोगी राहायचे असेल तर वाचा हसण्याचे हे ‘७’ फायदे!

Ahmednagarlive24
Published:

 हसण्यामुळे आरोग्यावर अनेक प्रकारचे चांगले परिणाम होतात. त्यामुळे व्यक्‍तीला आपण निरोगी असल्याची जाणीव होते. तणाव, निराशा आणि उच्च रक्‍तदाबासारख्या आजारांपासून स्वतःला दूर ठेवता येते.

हसण्याचे शरीराला आणि मेंदूला खूप फायदे मिळतात.हसण्याने माणूस फक्त दीर्घायुषीच होत नाही तर ह्द्यविकार , रक्तदाबाचा धोखाही कमी होतो.

केवळ आपल्या जराशा हसण्यामुळे फोटो चांगला येऊ शकतो, तर खळखळून हसल्यानं जीवनातील फोटो किती सुंदर होऊ शकतो याची कल्पना करा.

हसण्यामुळे हृदयाचा व्यायाम होता. रक्तसंचार सुरळीत होतं. हसल्यामुळे शरीरातून एंडोर्फिन रसायन निघतं, हे द्रव हृदयाला मजबूत करतं. हसल्यामुळे हार्ट अटॅकची शक्यतादेखील कमी होते.

दररोज एक तास हसण्याने 400 कॅलरीज ऊर्जाचा वापर होतो, ज्यामुळे लठ्ठपणा देखील नियंत्रणात राहतो. आजकाल बरेच हास्यक्लब देखील तणावपूर्ण जीवनात हसण्याच्या माध्यमाने दूर करण्याचे काम करत आहे.

एका शोधाप्रमाणे ऑ‍क्सिजनच्या उपस्थितीत कर्करोग सेल आणि अनेक प्रकाराचे हानिकारक बॅक्टेरिया आणि व्हायरस नष्ट होतात.

हसण्यामुळे ऑक्सिजन अधिक प्रमाणात मिळते आणि शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणादेखील मजबूत होते.

आजकाल प्रत्येकाचं आयुष्य ताणतणावाचे झाले आहे. हसण्यामुळे काही काळ हा ताणतणाव कमी होण्यास मदत होते. परिणामी रक्तदाबाच्या समस्या कमी होतात.

सकाळी हास्य योग केल्यानं दिवसभर प्रसन्न वाटतं. रात्री हास्य योग केल्यानं झोप चांगली येते. हास्य योगामुळे आमच्या शरीरात अनेक प्रकारच्या हार्मोन्सचा स्राव होतो, 

हसल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. आनंदी वातावरणामुळे दिवसभर खूश वाटतं. ताण जाणवत असेल तर एक-दोन जोक्स आपलं मूड बदलू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment