हिवाळ्यात आजारी नसेल पडायचे तर या चार पदार्थांपासून लांब राहा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- थंडीचा हंगाम चालू झाला आहे. थंडीचा हवामान जिवाणू वाढीसाठी पोषक असत.कमी झालेल्या तापमानामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती पण कमी होऊ शकते.

बहुतेकवेळा हिवाळ्यात पचेल असाच आहार घेण गरजेच असत. त्यामुळे हिवाळा ऋतूत कोणता आहार घ्यायचा नाही हे पाहन पण तितकच गरजेच असत.आज आम्ही तुम्हाला अशा चार पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे आपण हिवाळा ऋतूत आजारांपासून दूर राहू.

तळलेले पदार्थ :- तळलेले पदार्थ जिभेला चांगले लागतात म्हणून जास्त प्रमाणात खाले जातात.तळलेले पदार्थ खायला चांगले लागत असले तरी अशा पदार्थांमध्ये फॅट भरपूर प्रमाणावर असते.जास्त फॅट असल्यामुळे पित्तसोबतच कफ पण वाढतो. यामुळे आपल्याला मोठ्या त्रासाला सामोरे जावा लागू शकते.

हिस्टमिनयुक्त पदार्थ :- हिस्टमिनयुक्त पदार्थ जास्त खाणे पण शरीराला चांगले नसते.त्यातील अंडे,मशरूम,टोमॅटो,सुका मेवा आणि योगर्ट अशा पदार्थांमुळे कफ होतो.त्यामुळे आरोग्याचे त्रास उदभवू शकतात. नाक बंद होणे, छातीत कफ भरण्याची समस्या यामुळे उदभवू शकते.

कॅफीनयुक्त पेय :- कॅफीनयुक्त पेयांमध्ये कॉफी,एनर्जी ड्रिंक आणि इतर पेयांमध्ये कॅफिन असते. कॅफिन मुळे पण आरोग्याचे त्रास उदभवतात. कॅफ़िनमुळे डिहायड्रेशनचा त्रास उदभवू शकतो.त्यामुळे कफ आणि घशामध्ये त्रास उदभवतो.फुफ्फुसात कफ जमा होण्याची पण यामुळे भीती असते.

डेअरी प्रोडक्ट्स :- साधारण डॉक्टर आजारपणाच्या काळात डेअरी प्रॉडक्टपासून दूर राहायला सांगतात. दूध आणि पनीर सारख्या पदार्थांमुळे शरीरातील कफ वाढतो.ज्यामुळे फुफ्फुसात हवा जमा होते.त्यामुळे शरीराच्या आरोपाची परिस्थिती अजून बिघडू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment