केस काळे करायचे असतील तर हे पदार्थ सेवन करा ..

Ahmednagarlive24
Published:

आजकाल लहानपणीच केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. याची अनेक करणे असतात परंतु त्यापैकी एक म्हणजे  व्हिटॅमिन्सची कमतरता. त्यामुळे आहाराची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. जर आहारात खालील गोष्टींचा समावेश केला तर नक्कीच सुधारणा दिसून येईल.

१) अंड्याचा बलक – अंड्याच्या आतील पिवळ्या भागात व्हिटॅमिन्स असतात, जे तुम्हाला पांढऱ्या केसांच्या समस्येतून सुटका देतात. याशिवाय तुमच्या केसांना प्रोटिन आणि मिनरल्ससारखे पोषक घटकही मिळतात.

२) मशरूम – मशरूममधील व्हिटॅमिन्स पांढऱ्या केसांची समस्या कमी करण्यात मदत करतात. शिवाय डोक्याच्या त्वचेला येणारी खाजेची समस्याही दूर होते. मशरूममुळे केसांना आवश्यक पोषक घटकही मिळतात ज्यामुळे केसातील कोंडा, केस तुटण्याची समस्या कमी होते.

३)  साल्मन – साल्मनमध्ये व्हिटॅमिन्सशिवाय ओमेगा-3 फॅटी अॅसिडही असतं. जे केसांच्या विकासासाठी फायदेशीर असतं. पांढऱ्या केसांची समस्याही दूर होते. यातील पोषक घटक केसांना मजबूत बनवतात आणि केस तुटत नाहीत.

४) दही- दह्यात केसांसाठी फायदेशीर असलेले व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर तर होतेच, शिवाय केस चमकदारही होतात. आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना दही लावल्यानं पांढऱ्या केसांची समस्या कमी होईल.

५) गाजर – गाजरातील घटक केसांना लवकर पांढरे होण्यापासून रोखतात. गाजर खाल्ल्याने केसांची वाढही चांगली होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment