काही वर्षांतच हे शहर पाण्याखाली जाण्याचा धोका ! वाढत्या समुद्र पातळीमुळे नासाचा गंभीर इशारा

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi News

Marathi News : संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेले अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर वाढत्या जागतिक तापमानासोबतच येथील वाढती गर्दी आणि इमारतींमुळे संकटात आले आहे. या शहराचे वजन दिवसेंदिवस वाढत असल्याचे नमूद करीत नासाने वाढत्या वजनामुळे तसेच समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे न्यूयॉर्क शहर येत्या काही वर्षांमध्ये पाण्याखाली जाण्याचा गंभीर इशारा दिला आहे.

न्यूयॉर्क शहराचे वजन दिवसेंदिवस वाढत आहे. सोबतच जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी देखील वाढते आहे. या दोन्ही कारणांमुळे काही वर्षांमध्ये हे शहर पाण्याखाली जाऊ शकते,

त्यामुळे न्यूयॉर्कमधील लागार्डिया एअरपोर्ट, आर्थर अॅश स्टेडियम आणि कोनी आयलँड या ठिकाणांना सर्वात आधी फटका बसणार असून लागार्डिया आणि आर्थर स्टेडियम या दोन्ही जागा अनुक्रमे ३.७ आणि ४.६ मिलीमीटर प्रतिवर्ष या वेगाने खाली जात असल्याचे अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासाने स्पष्ट केले आहे.

न्यूयॉर्क शहराचे वजन हे १.७ ट्रिलियन पाऊंड असल्याचे एका रिपोर्टमध्ये समोर आले असून या शहरात १० लाखांहून अधिक मोठ्या इमारती आहेत. त्यामुळे भविष्यातील धोक्यापासून बचावासाठी आतापासून उपाययोजना करण्याची गरज नासाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe