आहारात करा ‘या’ सात प्रकारच्या तेलांचा समावेश आणि मिळवा उत्तम आरोग्य

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : आहारात योग्य तेल प्रमाणात घेतल्यास योग्य प्रमाणात फॅट्स शरीरात जातात. यातून शरीराला उर्जा मिळते. जर या ७ तेलांचा वापर केला तर आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

१) खोबरेल तेल: खोबरेल तेलाचा आहारात समावेश असेल तर त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. या तेलातील गुणधर्मामुळे मेटॅबॉलिझम सुधारते. न्युरॉलॉजिकल त्रास तसेच त्वचारोग कमी होतात.

२) ऑलिव्ह तेल: या तेलामुळे हृद्याचे कार्य तर सुधारतेच परंतु शरीरातील रक्तप्रवाहदेखील सुधारतो.

३) ओमेगा 3 फिश ऑईल: जर तुम्ही मांसाहार कात असाल, मासे खात असाल तर माश्याचे तेल आहारात अवश्य घ्यावे. या तेलामधून ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड मिळते. यामुळे हृद्याचे कार्य सुधारण्यास मदत होते.

४) अळशी – यामधील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड हृद्यविकारांपासून बचाव करते. त्यामुळे नियमित या तेलाचा वापर केल्याने आतड्याचा कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.

५) भोपळ्याच्या बियांपासून बनवलेले तेल: भोपळा हा बहुगुणी आहे. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे भोपळ्यास आयुर्वेदामध्ये जास्त महत्व आहे. या बियांचे तेलही उपयुक्त असते.

या तेलामुळे प्रोस्टेट ग्रंथींचे कार्य सुधारते. तर स्त्रियांमध्ये मोनोपॉजची लक्षण कमी करण्यास तसेच रक्तदाब कमी झाल्याने होणारी डोकेदुखी कमी करण्यास मदत होते.

६) अ‍ॅव्हॅकॅडो तेल: या तेलामध्ये व्हिटामिन ई, अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक असतात. या तेलामुळे त्वचेचा पोत सुधारतो. या तेलामुळे त्वचेचे पोषण होते.

७) अंबाडीच्या बियांचे तेल: अंबाडीच्या बियाचे तेलही भोपळ्याच्या बियांच्या तेलाप्रमाणे गुणकारी असतात. या अंबाडीच्या बियांच्या तेलामध्ये ओमेगा 3,6आणि 9 फॅटी अ‍ॅसिड असते. या तेलामुळे हृद्याचे विकार दूर होतात. तसेच केसांचे व नखांचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment