अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. हे विषाणू फुफ्फुसांवर आक्रमण करतात. किवा फुफ्फुसांला इन्फेक्शन असेल तर लवकर संक्रमण होते.
फुफ्फुसांचं इन्फेक्शन आणि कोरोनाचा व्हायरसपासून लांब राहण्यासाठी आज आम्ही काही उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवता येऊ शकतो.
1) मध मधाचे सेवन करणं आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतं. मधामध्ये अँटीऑक्सीडेंट्स, अँटीमाइक्रोबियल, अँटी-इंफ्लामेटरी गुण असतात. यामुळे फुफ्फुसं स्वच्छ होण्यास मदत होते. एक चमचा मध फुफ्फुसांसाठी लाभदायक ठरू शकते.
2) पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. गरम पाण्याची वाफ घ्याय, खोकला जास्त आल्यामुळे घसा खवखवतं असेल तर पाण्यात मध आणि लिंबू घालून प्या. धुम्रपान आणि मद्यपानापासून लांब राहा.
3) ग्रीन-टी ग्रीन-टी फुफ्फुसांच्या स्वच्छतेसाठी खुप लाभदायक आहे. ग्रीन-टीमध्ये भरपूर अँटीऑक्सीडेंट्स असतात.
तसेच फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन कमी करण्याचे कामही ग्रीन टी करते. ग्रीन-टीमधील इतर घटक धुरामुळे फुफ्फुसाचे होणारे नुकसान टाळण्यास मदत करतात.
4) तुळशीची पानं एका भांड्यात एक ग्लास गरम पाणी टाकून कमी आसेवर गॅसवर ठेवा. यात तुळशीची पाने, आल्याची पेस्ट गूळ टाकून ५ मिनिटे उकळू द्या.
जेव्हा या मिश्रणाला चांगली उकळी येईल तेव्हा हे मिश्रण ग्लासमध्ये टाका. हे तुम्ही दररोज थोडं थोडं सेवन करु शकता. या सिरपमुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल आणि शरीराचा वायू प्रदुषणाच्या प्रभावांपासून बचावही करेल.
5) आयुर्वेदिक चहा भांड्यात दूध टाकून ते कमी आसेवर गॅसवर ठेवा. नंतर त्यात हळद, तूप, आलं, काळे मिरे, लवंग आणि तुळशीची पाने टाका.
५ मिनिटे हे मिश्रण चांगलं उकळू द्या. नंतर यात मध टाका. हे दूध लहान मुलांसोबतच मोठ्यांसाठीही फायदेशीर आहे. त्यामुळे श्वासासंबंधी आजार बरे होण्यास मदत होईल.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com