अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- देशातून कोरोना विषाणू अद्याप हद्दपार झालेला नसतानाच पुन्हा एकदा एक मोठे संकट देशासमोर येऊन ठाकले आहे. ते म्हणजे ‘बर्ड फ्लू’…. भारतातील अनेक राज्यांमध्ये सध्या ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाला आहे.
‘बर्ड फ्लू’मुळे बदक, कोंबड्या, कावळे आणि इतर पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. पक्ष्यांच्या वाढत्या मृत्यूमुळे प्रशासन देखील सतर्क झालं आहे.
‘बर्ड फ्लू’चे पक्ष्यांमधून मानवामध्ये संक्रमण होण्याचाही धोका वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे या ‘बर्ड फ्लू’ला आपल्यापासून दूर कसं ठेवायचं? याबाबत अनेकजण संभ्रमात आहे. काळजी करू नका, या संकटापासून वाचण्यासाठी आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत, याचे पालन आपण करणे गरजेचे आहे.
पुढील गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात.
- अर्धवट उकडलेली अंडी खाणे टाळावी
- अर्धवट शिजवलेलं चिकन खाऊ नये
- पक्ष्यांशी थेट संपर्क टाळा
- कच्चे मांस उघड्यावर ठेवणं टाळा
- कच्च्या मांसाशी थेट संपर्क टाळा
या गोष्टी लक्षात ठेवा
- वारंवार हात धुत राहणं आणि स्वत:च्या स्वच्छतेची जास्तीत जास्त काळजी घेणं
- आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं.
- मास्क आणि हँडग्लोजचा वापर करावा.
- पूर्णपणे शिजवलेलं अन्न खाणं
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved