Honey in Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी मधाचे सेवन करणे योग्य आहे का?; जाणून घ्या तज्ञांचे मत

Ahmednagarlive24 office
Published:
Honey in Diabetes

Honey in Diabetes : आजकालच्या या धावपळीच्या जीवनात आपल्या शरीरावर अनेक परिणाम दिसून येतात. अयोग्य आहारामुळे बहुतेक जणांना मधुमेह आणि रक्तदाबाची समस्या भेडसावत आहे. खराब  जीवनशैलीमुळे आज मधुमेहाचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. शारीरिक हालचालींअभावी लोकांना मधुमेह होऊ लागला आहे. डॉक्टरांच्या मते आहार आणि जीवनशैलीत बदल करून हा आजार टाळता येऊ शकतो. तसेच, त्याचे दुष्परिणाम देखील कमी होऊ शकतात. तज्ञांच्या मते, मधुमेह असलेले लोक मधाचे सेवन करू शकतात. परंतु, यामध्ये त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी आणि इतर परिस्थिती नियंत्रणात असणे अत्यंत आवश्यक आहे.

वास्तविक, मधुमेह हा चयापचयाशी संबंधित आजार आहे. त्यामुळे इन्सुलिनचे उत्पादन कमी होऊ शकते. त्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. अशा स्थितीत तुम्हाला मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. शारीरिक हालचालींअभावी लोक मधुमेहाला बळी पडतात. त्याचबरोबर जंक फूड खाणाऱ्या लोकांनाही मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

अशातच या आजारात लोक मधाचे सेवन करू शकतात का? आजही या विषयावर दोन मतप्रवाह आहेत. एक वर्ग मधुमेहात मध न खाण्याचा सल्ला देतात, तर दुसरा वर्ग ते खाण्यास हरकत नसल्याचा दावा करतात. सध्या यावर संशोधन चालू आहे. त्याचबरोबर या विषयावर आहारतज्ज्ञ सांगतात हे साखरेचा नैसर्गिक स्रोत आहे. त्यामुळे ते अत्यंत मर्यादित प्रमाणात वापरले जाऊ शकते. मधामध्ये ग्लुकोज, फ्रक्टोज, माल्टोज आणि सुक्रोज आढळतात. यासोबतच यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, एन्झाइम्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आढळतात. अशावेळी साखरेऐवजी मध वापरणे हा कधीही उत्तम पर्याय ठरू शकतो.

तर काहींचे म्हणणे आहे की उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. ज्यामध्ये, मधाचे GI त्याच्या फुलांच्या स्त्रोतावर आणि प्रक्रिया करण्याच्या पद्धतीवर अधिक अवलंबून असते.

मधाचे इतर फायदे :-

मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि जखमा बरे करण्याचे गुणधर्म असतात. काही प्रकारचे मध त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी विशेषतः प्रसिद्ध आहेत. साखरेला पर्याय म्हणून मध वापरता येऊ शकते.

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यक्तीला जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेह झाल्यानंतर रोज व्यायाम केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. तसेच, यामुळे मूत्रपिंडावरील अतिरिक्त दबाव कमी होऊ शकतो. या काळात योगासने करण्याचाही सल्ला डॉक्टर देतात. दरम्यान, जर तुम्हाला मधुमेहामुळे इतर समस्या येत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe