कोरफड औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. विविध प्रकारच्या जखमा, भाजणं, कापणं यावर कोरफडीचा गर प्रभावी ठरतो. कोरफडीमुळे शरीराचा दाह कमी होतो. त्वचेचा काळपटपणा दूर करण्यासोबतच इतर त्वचाविकारही कोरफडीच्या वापरामुळे दूर होऊ शकतात.
त्वचा, केसांसोबत विविध विकारांमध्येही कोरफड वापरली जाते. अल्सरेटिव्ह कोलायटिस, जुनाट बद्धकोष्ठता, अपचन, पचनसंस्थेशी संबंधित इतर विकार यावरही कोरफड प्रभावी ठरू शकते. कोरफडीचा गर मिश्रीत पाणी प्यायल्याने शरीरातले विषारी घटक बाहेर पडायला मदत होते.
कोणत्याही पदार्थांची चव वाढवणारी कोथिंबीरही खूप औषधी आहे. यात फायबर, मॅग्नेशियम, मँगनिज, प्रथिनं आणि लोह असे घटक असतात. यासोबत ‘क’ जीवनसत्त्व आणि इतर पोषक तत्त्वांनीही कोथिंबीर समृद्ध आहे. कोथिंबिरीमुळे रक्तातल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होतं.
उलटी, मळमळ, पोटदुखी अशा विकारांमध्येही कोथिंबीर लाभदायी ठरू शकते. कोथिंबिरीमुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येते. मासिक पाळीशी संबंधित विकार यामुळे दूर होऊ शकतात.
- हवामान बदलले ! महाराष्ट्रात कसे असेल तापमान ? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी ?
- Pune News : पुण्यात ‘पाणी’ पेटणार ; PMC ला नोटीस देण्याचे विखे पाटलांचे आदेश
- सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले ! बीड जिल्ह्यात जे घडले, ते नगर जिल्ह्यात टळले…
- Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी वाढ ! असे आहेत आजचे दर
- शिर्डी येथे होणारे राष्ट्रीय अधिवेशन दिशा देणारे ठरेल : आ. दाते