अनेकांना साखर सोडायची इच्छा असते. पण प्रयत्न करूनही गोड पदार्थांचा मोह काही सुटत नाही. आहारातल्या साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा साखर हद्दपार करण्यासाठी काय करता येईल याबाबतचे हे मार्गदर्शन.
आरोग्यदायी आणि अनारोग्यदायी पदार्थांमध्ये फरक करायला शिका. कधी काय खायचं हे ठरवा. गोड खाण्याऐवजी आरोग्यदायी पदार्थाची निवड करा. जास्त काळ उपाशी राहणं टाळा. उकडलेल्या भाज्यांना प्राधान्य द्या. दिवसभरात कधीही गोड खावंसं वाटू शकतं.

गोड खाण्याच्या तीव्र इच्छेवर नियंत्रण ठेवता आलं नाही तर तुमचं वजन वाढू शकतं. अशा वेळी एखादं फळ जवळ ठेवा. सफरचंद, पेअर, पपई यापैकी काहीही तुम्ही खाऊ शकता. हंगामी फळांचा पर्याय निवडा.
अतिताणामुळे गोड खावंसं वाटतं. म्हणून तणावमुक्तीसाठी प्रयत्न करा. . गोड खाण्याची इच्छा झाली की लगेच उभं राहा आणि चालायला जा. यामुळे तुमचं लक्ष विचलित होईल.
- PF मधून पैसे काढल्यास कर भरावा लागतो का ? वाचा सविस्तर
- नवले पुलावरील अपघातांची मालिका थांबणार….; पुण्यातील ‘या’ भागात विकसित होणार नवीन रस्ता !
- एसटीप्रमाणे आता रेल्वेने सुद्धा मोफत प्रवास करता येणार…..! ‘या’ लोकांना मिळणार फ्री पास, वाचा सविस्तर
- Aadhar Card बाबत मोठी अपडेट ! ‘या’ 2 कोटी लोकांचे आधार कार्ड झालेत रद्द
- राज्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय













