उपवासाचे पदार्थ खाताना ही काळजी नक्की घ्या…

Ahmednagarlive24
Published:

उपास (उपाशी राहणं) आणि दुसरा म्हणजे उपवास, ज्यामध्ये आपण उपवासाचे पदार्थ खातो. यामध्ये आपण भगवंताचं नामस्मरण करून मन स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. हे दोन्ही प्रकार जर एकत्र मनाशी आले तर तो खरा भगवंतापर्यंत पोहोचला, असं म्हणावं लागेल.

म्हणजे फक्त उपवासाचे पदार्थ न खाता उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे सहवास, भगवंताच्या मनानं सहवासात राहणं, असा उपवास करावा.उपवासाचे पदार्थ खाताना व उपवास करताना तब्येतीची काळजी घेऊन करावा. ज्यांना मधुमेह, रक्तदाब यांसारखे त्रास आहेत त्यांनी शक्यतो उपवास करणं टाळावं.

पित्ताचा त्रास असेल, तर उपवासाचे पदार्थ जरा जपून खावेत. पूर्ण वेळ उपाशी राहून उपवास केल्यानं पित्त वाढते. उपाशी पोटी आंबट पदार्थ खाल्ल्यानं पित्त वाढतं. उपवासामध्ये राजगिरा, दूध, रताळे यांचा वापर उत्तम. फळं, ताक, दही, काकडी यांचाही समावेश ठेवावा.मधुमेही लोकांनी उपाशी राहणं टाळावं. 

साबुदाणा, वरई हे कर्बोदके जास्त देणारे पदार्थ असल्यानं मधुमेही लोकांनी याचा अतिवापर टाळावा. वजनवाढीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर चुकीच्या पद्धतीनं केलेला उपवास हा वजन वाढवितो आणि उपवासाचे पदार्थ कधीतरी खायला मिळतात असं म्हणून जर जास्तच खाणं झालं तर वजनवाढ होतेच.

सण आणि खाणं हे तर अगदी परममित्रच म्हणावे लागतील. आपल्याकडे वेगवेगळ्या सणांना वेगवेगळ्या पदार्थांचं महत्त्व असतं. यात अनेक सणांमध्ये उपवास करणं ही आपली प्रथा आहे. आलेल्या गणपतींमध्येही महिला हरितालिका, ऋषिपंचमी, गणेशचतुर्थी असे उपवास करताना दिसतात. हे उपवास दोन प्रकारचे म्हणता येतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment