पावसाळ्यात फजिती टाळण्यासाठी ह्या गोष्टी टाळा…

Published on -

मान्सून सुरू होण्याआधीच प्रत्येक घरात आरोग्याविषयी तक्रारी सुरू झाल्याचे दिसते. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पावसाच्या दुषीत पाण्याने आजार पसरतात.आज आपण पाहूयात पावसाळ्यात कोणत्या गोष्टी करू नयेत याबाबत माहिती

ह्या टिप्स नक्की फॉलो करा…

१) पावसाळ्यात पांढरे कपडे वापरू नये, कारण त्यावर चिखल उडाला तर ते डाग लवकर निघत नाहीत व दिवसभर तसेच डाग घेऊन राहावं लागतं. 

२)पावसाळ्यात जिन्स घालू नये.  कारण जिन्स लवकर वाळत नाही. पावसात भिजली तर दिवसभर ओली जिन्स घालून राहावे लागते. घट्ट असल्यामुळे त्वचा इन्फेक्शन होण्याची भीती असते. 

३) पावसाळ्यात लेदर्सच्या बॅग्ज वापरू नये, या पाण्यात  भिजल्या तर वाळत नाहीत व लवकर खराब होतात. त्यामुळे पावसाळ्यात अशा बॅग्ज टाळलेल्याच ब-या.

४) पावसाळ्यात पायघोळ कपडे घालू नयेत, तसेच, घट्ट कपडे टाळावेत, लूज कपडे घालावेत. चप्पला वॉटरप्रूफ वापरा.

५) पावसाळ्यात अनेकजण रबरी चपला वापरतात; पण त्यामुळे पायदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe