सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर आपण हात धुतो. पण घरातल्या स्वच्छतागृहाचा किंवा बाथरूमचा वापर केल्यानंतर प्रत्येक वेळी हात धुतले जातातच असं नाही. स्वच्छतागृहात कुठेच स्पर्श न झाल्यामुळे हातांना जंतूसंसर्ग होणार नाही, असा काहींचा समज असतो.
प्रत्यक्षात स्वच्छतागृह, बाथरूममध्ये असंख्य जंतूंचा वास असतो. लक्षवेधी बाब म्हणजे फक्त ३१ टक्के पुरुष आणि ६५ टक्के महिला सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर हात धुतात, असेएका अहवालातून समोर आले आहे. उर्वरित लोक आपल्या आरोग्याबाबत उदासीन असतात.

प्रत्यक्षात बाथरूम, स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर हात धुणं गरजेचं असतं. आपण तिथल्या फ्लशचा वापर करतो. नळाला हात लावतो. या ठिकाणी असंख्य बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया आपल्या हाताना चिकटतात आणि रोगराईला कारणीभूत ठरतात.
हात धुण्यामुळे आपण जवळपास १४ विकारांना लांब ठेऊ शकतो. आजारपणं टाळण्यासाठी आपल्याला फक्त ४० ते ५० सेकंद द्यायचे असतात. एवढ्या वेळेत आपण हात स्वच्छ धुवू शकतो. स्वच्छतागृह सार्वजनिक असो किंवा घरातलं, नियमित हात धुणं गरजेचं आहे.
- 80 हजाराचा iPhone 15 वर मिळणार 50% डिस्काउंट ! ‘या’ ठिकाणी मिळणार फक्त 40 हजारात
- 23 सप्टेंबरला महाराष्ट्रातील ‘या’ 29 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता ! हवामान खात्याचा नवा अंदाज
- हिंदुस्तान मोटर्सचे शेअर्स तुमच्याकडे आहेत का? पटकन वाचा आजची पोझिशन
- Yes Bank Share Price: तुमच्याकडे येस बँकेचा शेअर आहे का? आज SELL करावा की HOLD? वाचा तज्ञांचा सल्ला
- RHFL Share Price: 1 महिन्यात 20.11% ची घसरण! 5 रुपयापेक्षा कमी किमतीचा फायनान्स क्षेत्रातील ‘हा’ शेअर्स आज करेल का कमाल