Mangal Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रीय पंचांगानुसार, मंगळ 18 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 03:14 वाजता कन्या राशीत प्रवेश करेल. कन्या राशीला सुव्यवस्था, स्वच्छता, वेळेचे व्यवस्थापन आणि कामात सावधगिरीचे प्रतीक मानले जाते. जे मंगळाच्या नैसर्गिक गुणांशी जुळते. अशास्थितीत मंगळाच्या राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. चला तर मग जाणून घेऊया मंगळाच्या राशी परिवर्तनाचा कोणत्या राशींवर परिणाम दिसून येणार आहे.
मेष
मंगळाचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी असेल, यावेळी कामांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील. या काळात आर्थिक स्थिती सुधारू शकते. तसेच, जर तुम्ही न्यायालयीन प्रकरणात गुंतलेले असाल तर, निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात, ज्यामुळे तुम्हाला संघर्षाला सामोरे जावे लागू शकते. तरी कोणतेही काम सावधगिरीने करण्याचा सल्ला दिला जातो. या काळात आपल्या रागावर नियंत्रण आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल. तरच पुढची कामे मार्गी लागतील.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळाच्या संक्रमणाचा प्रभाव फलदायी मानला जातो. या काळात व्यवसाय क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक क्षेत्रातही सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, जे तुमच्या करिअरसाठी सकारात्मक परिणाम देऊ शकतात. दुसरीकडे, ज्यांनी आपले व्यवसाय क्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्यासाठी हा काळ फलदायी ठरू शकतो.
कर्क
कर्क राशीत मंगळाच्या संक्रमणाचा प्रभाव अनुकूल मानला जातो, जो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ यश मिळवण्याची चांगली संधी आहे. तुम्ही तुमची मेहनत घेऊन तुमचे ध्येय साध्य करू शकता. या काळात शत्रूपासून सावध राहण्याची गरज आहे. काही लोक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात.
वृश्चिक
वृश्चिक राशीमध्ये मंगळाचे संक्रमण शुभ मानले जात आहे. या काळात समाजातील तुमचे संबंध चांगले होतील. या काळात वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी यश मिळवू शकता. ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांनाही कर्जापासून मुक्ती मिळू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. तसेच आरोग्याशी संबंधित समस्याही दूर होतील.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ शुभ मनाला जात आहे. या दरम्यान तुम्हाला कार्यक्षेत्रात विशेष लाभ मिळू शकतो. जर तुम्ही कार्यक्षेत्रात बदल शोधत असाल तर तुम्हाला नवीन आणि सकारात्मक संधी मिळू शकतात. या काळात तुमचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढू शकतो. पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. ज्याद्वारे जीवनाच्या वाटचालीतून सहज मार्ग मिळतील आणि तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकाल.
कन्या
कन्या राशीतील मंगळाचे संक्रमण मकर राशीच्या शारीरिक आरोग्यासाठी चांगले मानले जाते. या संक्रमणादरम्यान तुम्हाला अध्यात्मिक क्रियाकलापांमध्ये स्वारस्य असू शकते. त्यामुळे तुम्ही हवन, सत्यनारायण कथा यासारख्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. या काळात बोलण्यावर नियंत्रण ठेवा.