नासाने शोधली आकाशगंगांची जोडी ! संशोधकही थक्क

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi News

Marathi News : नासा आणि ईएस अंतराळ संशोधन संस्थांनी अंतराळ यानाद्वारे हबल स्पेस टेलिस्कोपचा वापर करून एकमेकांशी जोडलेल्या आकाशगंगांच्या जोडीची काही आश्चर्यकारक छायाचित्रे टिपली आहेत.

या अद्भुत आकाशगंगांचे छायाचित्र नासाने शेअर केले असून अंतराळातील ही मंत्रमुग्ध करणारी प्रतिमा पाहून संशोधकही थक्क झाले आहेत.

यूएस स्पेस एजन्सी नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन) सूर्यमालेतील आकाशगंगा, तारे आणि ग्रहांशी संबंधित अनेक नवनवीन शोधांच्या अद्यावत माहितीने अंतराळ प्रेमींना आनंदित करत असते.

आता नासाच्या आणि युरोपीयन स्पेस एजन्सी ईएसए) च्या हबल स्पेस टेलिस्कोपचा वापर करून ही विस्तृत छायाचित्रे टिपण्यात आली आहेत. त्यात अर्प- मैडोर २३३९-६६१ नावाच्या परस्पर जोडलेल्या आकाशगंगा जोडीचा लक्ष वेधून घेणारा फोटो प्रसिद्ध केला आहे.

या आकाशगंगांची जोडी पृथ्वीपासून सुमारे पाचशे दशलक्ष प्रकाशवर्षे दूर स्थित असल्याचा नासातील शास्त्रज्ञांचा दावा असून या आकाशगंगांच्या छायाचित्रांसोबत त्यांच्याविषयीची संक्षिप्त माहितीही नासाने सार्वजनिक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe