एकटे राहणारी मुले असतात लट्ठ !

Ahmednagarlive24
Published:

न्यूयॉर्क : लठ्ठपणासाठी बदलती जीवनशैली एक प्रमुख कारण समजले जाते. अमेरिकी शास्त्रज्ञांनंी लठ्ठपणाशी संबंधित एक नवीन दावा केला असून त्यांच्या म्हणण्यानुसार, जी मुले एकटी राहतात वा वाढत्या वयामध्ये ज्या मुलांच्या शेजारीपाजारी कुणी राहत नाही वा त्यांना शेजाऱ्यांची सोबत मिळत नाही, त्यांच्यामध्ये मोठेपणा अन्य मुलांच्या तुलनेत लठ्ठपणाची शक्यता एक-तृतियांशाने जास्त असते.

या अध्ययनाचे प्रमुख आणि कार्नेल विद्यापीठातील प्राध्यापक स्टीवन अल्वराडो यांनी पालकांना याबाबत सावध करताना असे म्हटले आहे की, वाढत्या वयामध्ये मुलांचे घराबाहेर पडून खेळणे, उड्या मारणे आवश्यक आहे.

समजा मुले सुरुवातीच्या वर्षामध्ये घरातून बाहेरच पडत नसतील तर भविष्यात त्यांच्या शरीरावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो व मोठेपणा त्यांना लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते.

या अध्ययनानुसार, जी मुले दहा वर्षांच्या वयापर्यंत एकटी राहतात, त्यांच्यात मोठेपणी लठ्ठपणाची तक्रार अन्य मुलांच्या तुलनेत १६ टक्के जास्त असते. दुसरीकडे ११ ते १९ वयोगटातील एकटी राहत असतील तर त्यांच्या लठ्ठपणाची शक्यता २९ टक्के जास्त असते.

शेजाऱ्यांपासून वंचित लोकांची शास्त्रज्ञांनी सात गटात विभागणी केली. त्यांच्यात सरासरी कमाई, घरची परिस्थिती, गरिबीत राहणाऱ्या कुटुंबांची संख्या, बेरोजगारी व पदवीधारकांचा समावेश करण्यात आला होता.

समजा मुले सुरुवातीच्या वर्षामध्ये घरातून बाहेरच पडत नसतील तर भविष्यात त्यांच्या शरीरावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो व मोठेपणा त्यांना लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. या अध्ययनानुसार, जी मुले दहा वर्षांच्या वयापर्यंत एकटी राहतात, त्यांच्यात मोठेपणी लठ्ठपणाची तक्रार अन्य मुलांच्या तुलनेत १६ टक्के जास्त असते.

दुसरीकडे ११ ते १९ वयोगटातील एकटी राहत असतील तर त्यांच्या लठ्ठपणाची शक्यता २९ टक्के जास्त असते. शेजाऱ्यांपासून वंचित लोकांची शास्त्रज्ञांनी सात गटात विभागणी केली. त्यांच्यात सरासरी कमाई, घरची परिस्थिती, गरिबीत राहणाऱ्या कुटुंबांची संख्या, बेरोजगारी व पदवीधारकांचा समावेश करण्यात आला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment