‘यावेळचा’ व्यायाम वाढवतो स्मरणशक्ती !

Ahmednagarlive24
Published:

मेलबर्न : शाळेत शिकविलेला अभ्यास बऱ्याचदा मुले घरी पोहोचताच विसरून जातात. पण आता ही समस्या फक्त थोड्याशा व्यायामाद्वारे दूर केली जाऊ शकेल.

ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केलेल्या एका ताज्या संशोधनात असे दिसून आले की, नवीन काहीतरी शिकल्यानंतर थोडाफार व्यायाम केल्यास तो अभ्यास मुलांच्या खासकरून मुलीच्या जास्त काळपर्यंत लक्षात राहण्यास मदत होते.

या अध्ययनासाठी शास्त्रज्ञांनी २६५ लोकांची निवड करून त्यांच्यावर चार प्रयोग केले. त्यांच्यातील काही मुलांना अभ्यासानंतर पाच मिनिटांसाठी एरोबिकच्या काही स्टेप्स करण्यास सांगितल्या, तर उरलेल्यांना कोणताही प्रकारचा व्यायाम करू दिला नाही.

अर्थात या प्रयोगाचे परिणाम सर्वच मुलांमध्ये एकसमान दिसून आले नाहीत. मात्र ज्या मुलींना व्यायाम केला होता, त्यांच्या डोक्यात शिकविलेला धडा अन्य मुलांच्या तुलनेत चांगला आठवणीत राहिला.

या संशोधनाशी संबंधित युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्सचे स्टीवन मोस्ट यांनी सांगितले की, या मुलांनी अभ्यास केला व व्यायामनंतर तो त्यांच्या चांगल्याप्रकारे आठवणीत राहिला. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणते, या प्रयोगाचा मुलांवर मुलींएवढा प्रभाव दिसून आला नाही.

हा लैंगिक भिन्नतेचा परिणाम होता वा प्रयोगाच्या परिस्थितीचा हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही, असे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment