वॉशिंग्टन : शास्त्रज्ञांनी बॅक्टेरियाच्या मदतीने फळे आणि दुग्धोत्पादनांपासून नव्या पद्धतीने साखर तयार केली असून तिच्यात सामान्य साखरेच्या तुलनेत अवघ्या ३८ टक्के कॅलरी आहेत.
या साखरेला ‘टॅगाटोज’ असे म्हटले जाते. अमेरिकेतील टफ्ट्स विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, आतापर्यंत या साखरेमुळे होणारा कोणत्याही प्रकारचा दुष्प्रभाव समोर आलेले नाही.
टॅगाटोजला अमेरिकेच्या खाद्यान्न नियंत्रक एफडीएची मान्यता मिळाली आहे. कॅलरी कमी असण्यासोबतच सामान्य साखरेच्या तुलनेत टॅगोटोजची आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत.
शास्त्रज्ञांनी सांगितले की, ही साखर मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी लाभदायक ठरू शकते. सोबतच सामान्य साखरेव्यतिरिक्त या साखरेच्या वापरामुळे दात किडण्याची शक्यता कमी असते. साधारणपणे टॅगाटोज बनविण्याची प्रक्रिया अतिशय जटिल असते.
सामान्य साखरेच्या तुलनेत तिचे उत्पादनही जेमतेम ३० टक्के होते. टफ्ट्स विद्यापीठातील शास्त्रज्ञ आाता एक नव्या बॅक्टेरियाच्या मदतीने ही साखर तयार करण्याची नवी पद्धत शोधत आहेत.
या प्रक्रियेमध्ये बॅक्टेरिया सूक्ष्म बायोरिॲक्टरप्रमाणे काम करतात. या प्रक्रियेत सामान्य साखरेच्या तुलनेत ८५ टक्के टॅगाटोज बनविणे शक्य आहे.