लंडन : दिवसातून फक्त दोन ग्लास डायट ड्रिंक पिल्यामुळे लवकर मृत्यू ओढावण्याचा धोका जास्त वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अध्ययनातून ही माहिती देण्यात आली आहे.
ब्रिटनसह दहा देशांतील ४.५ लाखांपेक्षा जास्त प्रौढांवर केलेल्या अध्ययनातून हा निष्कर्ष समोर आला आहे. त्यात सगळ्या प्रकारच्या सॉफ्ट ड्रिंकच्या रोजच्या सेवनाचा संबंध तारुण्यात मृत्यू होण्याच्या शक्यतेशी जोडलेला असल्याचे दिसून आले.
आरोग्य संघटनेच्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, अशा शीतपेयांऐवजी पाणी घेणे जास्त विवेकपूर्ण ठरेल. त्यांच्या म्हणण्यानुसार, लोकांना आपल्या आहारातून शीतपेय दूर करण्याची आवश्यकता आहे.
असे सांगितले जाते की, शीतपेय आणि मृत्यू यांच्यातील संबंध स्पष्ट करणारे हे सर्वात मोठे अध्ययन आहे. यापूर्वीही अशा प्रकारची अध्ययने छोट्या प्रमाणात झालेली आहे. त्यांच्यातून शीतपेये व मृत्यू यांच्यातील संबंधांचा संकेत दिला होता. मात्र त्यात एवढे नाट्यमय अंतर आढळून आले नव्हते.
- नितीन गडकरींची मोठी घोषणा ! टोल रांगेत थांबण्याची गरज संपणार…
- Cheapest electric car : १ लाखांत इलेक्ट्रिक कार ! सिंगल चार्जवर किती चालणार ?
- Artificial Intelligence मध्ये करिअर कराल तर लाखो कमवाल ! अशी आहे करिअरची मोठी संधी!
- शेतजमीन किंवा मालमत्तेवर अतिक्रमण झालाय का? ‘या’ मार्गांचा वापर करा आणि स्वतःचा हक्क मिळवा
- शक्तीपीठ महामार्ग नियोजित मार्गानुसारच होणार! दोन महिन्यात मोजणी करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश