कर्करोगावर वैज्ञानिकांनी रामबाण उपाय शोधून काढला!

Ahmednagarlive24
Published:

लाखो लोकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाऱ्या कर्करोगावर वैज्ञानिकांनी रामबाण उपाय शोधून काढला आहे. प्रत्येक प्रकारच्या कर्करोगावर मात करणारा काउपॉक्स प्रकारचा विषाणू वैज्ञानिकांनी विकसित केला आहे. त्यामुळे भविष्यात कर्करोगावर मात मिळवता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ऑस्ट्रेलियातील बायोटेक कंपनी इमुजीनद्वारे कर्करोगावरील उपचार विकसित केला जात आहे. अमेरिकन कर्करोग तज्ज्ञ प्राध्यापक युमन फोंग यांच्याकडून कर्करोगाच्या उपचारावर काम केले जात आहे. उपचार पद्धतीला सीएफ३३ असे नवे नाव देण्यात आले आहे.

या उपचाराची उंदरांवर यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात सर्व प्रकारचे कर्करोग बरे होण्याची आशा पल्लवित झाली आहे. कर्करोगाच्या रुग्णांवर पुढील वर्षी या उपचाराची चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.

त्यातही प्रामुख्याने स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णांची निवड करण्यात येईल. फोंग यांच्याकडून यासंदर्भात ऑस्ट्रेलियासह विविध देशांमध्ये वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. शेवटच्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग, मेलेनोमा, फुप्फुसाचा कर्करोग, मूत्राशय, जठरासंबंधी आणि आतड्यांच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्णांवर पहिल्या टप्प्यात चाचणी केली जाणार आहे.

उंदरांवरील प्रायोगिक यश हे मानवावरदेखील परिणामकारक ठरेल, असे ठोसपणे सांगता येणार नाही; परंतु मानवांमध्ये कर्करोगाशी लढण्यासाठी इतर विशिष्ट विषाणू प्रभावी ठरल्याने नवीन विषाणू अधिक उपायकारक ठरण्याची शक्यता प्राध्यापक फोंग यांनी व्यक्त केली आहे.

जवळपास २०० वर्षांपूर्वी काउपॉक्सने लोकांचे देवीसारख्या गंभीर साथीपासून संरक्षण केले. त्यामुळे हा विषाणू मानवासाठी प्राणघातक नाही.

त्यामुळे काउपॉक्समध्ये इतर विषाणू मिसळून नवीन उपचार पद्धती विकसित करण्यात आली आहे. ही पद्धत कर्करोगावर मात करू शकते, असा विश्वास फोंग यांनी व्यक्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment