रोज चार मिनिटे व्यायाम करून त्याने केले १३ किलो वजन कमी!

Published on -

टोकियो : जपानमधील एक व्यक्ती सध्या सोशल मीडियावर भलताच चर्चेत आला आहे. त्याचे कारणही मोठे अनोखे आणि हैराण करणारे आहे. कारण या व्यक्तीने फक्त दिवसाला फक्त चार मिनिटे व्यायाम करून स्वत:चा फॅटीवरून फिट असा कायापालट करून घेतला आहे.

हिरांगी सेंसेई नावाच्या या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, चार मिनिटांच्या या व्यायामाने जी कमाल केली आहे, तेवढ्यासाठी त्याला जिममध्ये एक तास घाम गाळावा लागत होता. हिरांगीने मार्चमध्ये ट्विटरवर आपले एक छायाचित्र टाकले होते.

त्यात त्याचे पोट सुटलेले होते आणि एकदम अनफिट वाटत होता. या छायाचित्रासोबत त्याने काही महिन्यांत पूर्णपणे फिट होऊन पुन्हा आपले छायाचित्र ट्विटरवर टाकण्याचे वचन त्याने दिले होते. तसे त्याने करूनही दाखविले.

ताज्या छायाचित्रात सुटलेल्या पोटाची जागा सिक्स पॅक्स ॲब्जने घेतली आहे व स्नायूही पूर्वीपेक्षा बळकट आहेत. हिरांगी सांगतो की, या बदलामागे ताबाता व्यायामप्रकार कारणीभूत आहे.

चार मिनिटांच्या या व्यायामात २० सेकंदात एरोविक्स व शरीराची क्षमता वाढविणाऱ्या कसरतीचे आठ सेट, नंतर दहा सेकंद आराम व नंतर हाच पॅटर्न चार मिनिटे फॉलो करून व्यायाम करण्याचा समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe