तुमचे Pan Card सुरु आहे का ? खराब झालेय ? असे बनवा नवे कार्ड

Ahmednagarlive24
Published:

पॅन कार्ड (Permanent Account Number) हे देशातील आर्थिक व्यवहारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हरवलेले, खराब झालेले किंवा निष्क्रिय पॅन कार्ड तुमच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम करू शकते. मात्र, आयकर विभागाने यासाठी सोपी ऑनलाइन प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे.

पॅन कार्ड हरवले, खराब झाले किंवा निष्क्रिय झाले असल्यास, घाबरू नका. आयकर विभागाच्या या सोप्या सुविधांचा लाभ घ्या आणि तुमचे पॅन पुन्हा सक्रिय किंवा पुन्हा प्रिंट करू शकता. आज ह्या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात ह्याबद्दलची सर्व माहिती

तुमचे पॅन कार्ड सक्रिय आहे की निष्क्रिय? असे तपासा:
पॅन कार्ड सक्रिय आहे की नाही हे तपासण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकृत पोर्टलवर विशेष सुविधा दिली गेली आहे.

  1. वेबसाइटला भेट द्या: Income Tax Portal.
  2. “Verify PAN Status” वर क्लिक करा.
  3. आवश्यक माहिती भरून, ओटीपी व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
  4. स्क्रीनवर “PAN is Active” किंवा “PAN is Inactive” असे स्पष्ट होईल.

पॅन निष्क्रिय असल्यास, ते पुन्हा सक्रिय करण्याची पद्धत:
जर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय असल्याचे समजले, तर आयकर विभागाच्या कार्यालयात अर्ज सादर करावा लागतो. आवश्यक कागदपत्रांमध्ये गेल्या तीन वर्षांचे आयटीआर, पॅन कार्डची प्रत, आणि नुकसानभरपाई बाँड समाविष्ट आहे. अधिकारी तुमच्या अर्जाची तपासणी करून 15-30 दिवसांत पॅन पुन्हा सक्रिय करतात.

पॅन कार्ड हरवले किंवा खराब झाले? पुन्हा प्रिंट करा :
आयकर विभागाच्या पोर्टलवर “Reprint PAN Card” हा पर्याय निवडून हरवलेले किंवा खराब झालेले पॅन कार्ड सहज पुन्हा प्रिंट करता येते. ऑनलाइन फॉर्म भरून, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून शुल्क भरावे लागते. सबमिट केल्यानंतर, तुम्हाला ट्रॅकिंग नंबर दिला जातो, ज्यामुळे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.

पुन्हा प्रिंट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • ओळख पुरावा: आधार कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स.
  • पत्ता पुरावा: वीज बिल, बँक स्टेटमेंट किंवा रेशन कार्ड.
  • जन्म प्रमाणपत्र: अधिकृत प्रमाणपत्र किंवा दहावीचे प्रमाणपत्र.

पॅन कार्ड नसल्याने होणारा अडथळा :
पॅन कार्डशिवाय बँकिंग व्यवहार, गुंतवणूक, आयटीआर फाइलिंगसह अनेक महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करणे कठीण होते. त्यामुळे निष्क्रिय पॅन सक्रिय करणे किंवा हरवलेले पॅन पुनर्मुद्रित करणे अत्यावश्यक आहे.

संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन:
आयकर विभागाने पॅन कार्डशी संबंधित सर्व सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांना कार्यालयात जाण्याची गरज कमी झाली आहे. आवश्यक माहिती भरून काही मिनिटांतच प्रक्रिया पूर्ण करता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe