PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘या’ पदांकरिता भरती सुरु…

PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील इथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर याकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहू शकतात.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “तज्ञ वैदयकिय अधिकारी” पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उक्त नमुद रुग्णालयातील विविध विभागातील कामकाजाकरीता इच्छुक तज्ञ वैदयकिय अधिकारी यांचेकडुन अर्ज मागविणेत येत असुन सदर तज्ञ वैदयकीय अधिकारी यांनी दर सोमवारी मुलाखतीकरिता हजर राहावे.

पदाचे नाव

या भरती अंतर्गत तज्ञ वैदयकिय अधिकारी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

ही भरती एकूण 80 जागा भरण्यासाठी होत आहे.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

नोकरी ठिकाण पिंपरी चिंचवड हे आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

मुलाखत वैदयकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैदयकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-१८ यांचे कार्यालयात घेण्यात येणार आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखत दर सोमवारी घेण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-मुलाखतीसाठी दर सोमवारी हजर राहायचे आहे.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe