अहमदनगर लाईव्ह24 टीम :- सध्या जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे,याचा धोका लहान मुलानाही मोठ्या प्रमाणात आहे, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोरोना पासून बचाव होईल अश्या महत्वाच्या टिप्स
मुलांनी हात चांगले धुतले की नाही पाहावे. त्यांना साबण, कोमट पाणी आणि अल्कोहलयुक्त हँड सॅनिटायझरने हात स्वच्छ करायला सांगावे. तोंडाला मास्क लावावा. चांगल्या मास्कचा वापर करावा. घरातून निघण्यापूर्वी मास्क लावूनच निघावे.
आपल्या बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नये. प्राण्यांपासून लांब राहणे, मीठाचे सेवन करणे टाळावे. बाहेरचे खाद्यपदार्थ घेणे टाळावे. शिंकताना, खोकताना तोंडावर रुमालाचा वापर करणे. भरपूर विश्रांती घेणे. भरपूर पेय घेणे. मनाने औषधी घेऊ नका.
दूध आणि हळद
गरम पाणी किंवा गरम दुधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो. हळद अँटीव्हायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते, जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते.

लिंबू आणि मध
लिंबू आणि मधाचा वापर सर्दी-खोकल्यात उपयुक्त ठरतो. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दुधात मिसळून प्यावं, खूप फायदा होतो.
लिंबू आणि मधाचा वापर सर्दी-खोकल्यात उपयुक्त ठरतो. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दुधात मिसळून प्यावं, खूप फायदा होतो.
तुळशीची पाने आणि आले
तुळस आणि आले सर्दी-खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. याच्या सेवनाने लगेच आराम पडतो. एक कप गरम पाण्यात तुळशीची पाच-सात पाने, त्यात आल्याचा एक तुकडा टाकावा. त्याला काही वेळ उकळून काढा तयार करावा. जेव्हा पाणी अगदी अर्धे होईल, तेव्हा तो काढा प्यावा.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com