‘हे’ पाच मोबाईल नंबर लक्षात ठेवा, फोन उचलताच तुमचे बँक खाते होईल रिकामे

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi News

Marathi News : आजकाल फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. त्यामुळे फोन किंवा मेसेजच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना वाढत आहेत.

सध्या हॅकर्स कोणालाही फसवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असतात. त्यामुळे हॅकर्सचा शोध घेणे अवघड झाले आहे. यापैकी एक मार्ग म्हणजे लोकांना कॉल करणे आणि लोकांना जाळ्यात अडकविणे.

ते वेगवेगळ्या नम्बरवरून कॉल करतात व खाते रिकामे करून टाकतात. आता अशा काही नंबरचा BeenVerified यांच्या रिपोर्टमध्ये खुलासा झाला आहे. यामध्ये अशा पाच नंबरबाबत माहिती दिली आहे की ज्यावरून फसवणुकीची क्रिया केली जाते.

त्यामुळे तुम्हाला त्या 5 नंबर बद्दल माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेले पैसे सुरक्षित ठेवू शकाल.

1. 865630-4266

हा नम्बर लक्षात ठेवा. या नंबरवरून तुमचे अकाऊंट लॉक झाले असून ते अनलॉक करण्याबाबत सांगण्यात येते. तुमचे अकाऊंट ब्लॉक झाले आहे, जर तुम्हाला ते अनब्लॉक करायचे असेल तर दिलेल्या लिंकवर क्लिक करा असं या नम्बरवरून सांगितलं जात. लिंकवर क्लिक करताच व्हायरस फोनमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर हॅकर्स आपले काम करतात.

2. 469709-7630

याच क्रमांकावरून मदतीची विनंती करण्यात येते. म्हणजे मी तुझ्या नातेवाइकाचा भाऊ आहे, मला दोन हजार रुपये हवे आहेत, लवकर पाठवा असं सांगितलं जात. बरेच लोक फसतातही आणि पैसे पाठवतात. आणि परत त्यांना कॉल करताच फोन नंबर बंद असल्याचे आढळून येते.

3. 863532-7969

या नंबरवरून तुमचे डेबिट कार्ड ब्लॉक झाल्याची माहिती देण्यात येते. हे कार्ड पुढे चालू ठेवायचे असेल तर पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तेथे तुमच्या कार्डचा तपशील टाका. असे सांगिले जाते. असे केल्याने सर्व डिटेल्स हॅकर्सपर्यंत पोहोचतात. आणि त्यानंतर तुम्हाला विश्वासात घेऊन ओटीपी विचारला जातो.

4. 312339-1227

या क्रमांकाद्वारे लोकांना नवं नवीन योजना सांगितल्या जात. या फसव्या योजनांमध्ये अनेक लोक अडकले आहेत. उदा. वजन कमी करायचे असेल तर हा क्लास ज्वॉइन करा. त्यासाठी संपूर्ण नोंदणी फॉर्म भरा. याद्वारे यूजर्सचे सर्व तपशील त्या फॉर्ममध्येच घेतले जातात.

5. 347437-1689

या फोन नंबर वरून येणारा कॉल हा तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी टिप्स देण्याचे आश्वासन देतो. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर दिलेल्या लिंकवर क्लिक करा, सल्ल्यासोबत तुम्हाला छोट्या कर्जाची मदतही मिळेल असे सांगितले जाते.

लिंकवर क्लिक करताच बँक खात्यातून खाते रिकामे झाल्याचा संदेश येतो. अशा परिस्थितीत तुम्हाला सुरक्षित राहायचे असेल तर कोणत्याही अनोळखी नंबरच्या लिंकवर क्लिक करू नका. तसेच, कोणत्याही परिस्थितीत OTP शेअर करू नका. खबरदारी घेतल्यास कोणताही हॅकर खाते हॅक करू शकणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe