ऑक्टोबरमध्ये एकाच महिन्यात सूर्य आणि चंद्रग्रहण ! वाचा कोणत्या दिवशी ?

Published on -

Marathi news : यंदा एकूण चार ग्रहणे होणार होती, त्यापैकी पहिले सूर्यग्रहण २० एप्रिलला झाले, तर चंद्रग्रहण ५ मे रोजी रात्री झाले. परंतु खगोलीय घडामोडींच्या दृष्टिकोनातून ऑक्टोबर विशेष मानला जात आहे. या ऑक्टोबरमध्ये आणखी दोन ग्रहणे आहेत. क्वचितच घडणारा एक विशेष योगायोग म्हणूनही या खगोलीय घटनेचे वर्णन केले जात आहे.

यंदाचा ऑक्टोबर असा असणार आहे, ज्यामध्ये दोन ग्रहणे दिसणार आहेत. ही ग्रहणे या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आणि वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असेल. दुसरे सूर्यग्रहण १४ ऑक्टोबर २०२३ ला दिसणार आहे.

ऑक्टोबर २०२३ ला दिसणार आहे. जे एक कंकणाकृती पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे आणि त्याला ‘रिंग ऑफ फायर’ देखील म्हटले जाऊ शकते. हे कंकणाकृती सूर्यग्रहण उत्तर-पश्चिम युनायटेड स्टेट्स, मेक्सिको, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक आणि आर्क्टिक प्रदेशांसह अनेक भागांमधून पाहाता येईल.

याशिवाय, इतर पाश्चात्त्य देशांमधून सूर्यग्रहणाचा काही भाग पाहाता येईल. सूर्यग्रहण भारतातून पाहता येणार नाही. तर २०२३ मधील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण २८-२९ ऑक्टोबरच्या रात्री दिसणार आहे.

हे ग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलियासह जगातील अनेक भागांतून पाहाता येणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण असेल, ज्यामध्ये चंद्राच्या काही भागालाच ग्रहण लागणार आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe