1 लाख रुपयाची मशीन खरेदी करून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, महिन्याकाठी होणार लाखोंची कमाई, सरकारही करणार मदत

Ahmednagarlive24 office
Published:
Business Idea In Marathi

Business Idea In Marathi : अलीकडे तरुण वर्गाचा माईंड सेट चेंज झाला आहे. पूर्वी तरुण वर्ग नोकरीला पसंती दाखवत. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. विशेषता कोरोना काळापासून नोकरी ऐवजी व्यवसाय करण्याकडे तरुणाईचा कल आहे. खरंतर कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, यामुळे नोकरीवरील विश्वास आता कमी झाला आहे.

आता तरुण वर्गाला नोकरी ऐवजी छोटा का होईना पण व्यवसाय सुरू करायचा आहे. जर तुम्हीही हाच विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. जर तुम्हीही इतर तरुणांप्रमाणेच व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल पण कोणता व्यवसाय सुरू करायचा हे सुचत नसेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात.

कारण की, आज आपण अशा एका व्यवसायाची कल्पना म्हणजेच बिझनेस आयडिया जाणून घेणार आहोत जो व्यवसाय कधीच मंदीत जाऊ शकत नाही. आज आपण सकाळी सर्वप्रथम अंघोळ करतांना ज्याची गरज भासते ती महत्त्वाची वस्तू बनवण्याच्या बिजनेस आयडियाविषयी माहिती पाहणार आहोत. आज आपण सोप मेकिंग म्हणजेच साबण बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करायचा हे पाहणार आहोत.

कसा सुरु करणार साबण बनवण्याचा व्यवसाय

आपण सर्वजण साबण वापरतो. कोरोना काळापासून तर हॅन्ड वॉश करण्यासाठी साबणाचा वापर सर्वाधिक केला जाऊ लागला आहे. यामुळे साबणाची मागणी बाजारात कायमच राहते. साबणाचे अनेक प्रकार आहेत. यात कपड्याचा साबण, आंघोळीचा साबण, हॅन्ड वॉशचा साबण, लहान मुलांचा साबण, भांड्याचा साबण असे अनेक प्रकारचे साबण बाजारात उपलब्ध आहेत.

आपण हे सर्व साबण बनवू शकता. किंवा कोणताही साबणाचा एक पर्याय निवडून तो साबण बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरातूनही सुरू करू शकता. जर तुम्ही कमी गुंतवणुकीत आणि छोट्या स्तरावर हा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर या व्यवसायासाठी तुम्हाला 750 स्क्वेअर फिट जागेची गरज भासणार आहे. जर तुमचे घर मोठे असेल तर तुम्ही हा व्यवसाय घरातूनही सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जागे सोबतच काही मशीन्सची गरज लागणार आहे.

कोणत्या मशीन्स लागणार?

या व्यवसायासाठी तुम्हाला सोप मेकिंग मशीन म्हणजेच साबण बनवण्याची मशीन खरेदी करावी लागणार आहे. ही मशीन साधारणता एक लाख रुपये पर्यंत उपलब्ध होते. हा व्यवसाय सुरू करतांना मशीन,

लेबर आणि जागेसाठी जवळपास चार ते पाच लाख रुपयांचा खर्च करावा लागू शकतो. तसेच एकदा हा व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला या व्यवसायातून तीस ते पस्तीस टक्के पर्यंत फायदा मिळू शकतो. म्हणजे जेवढा तुमचा सेल वाढेल तेवढा तुम्हाला या व्यवसायातून फायदा मिळणार आहे.

सरकारही करणार मदत

विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सरकारकडून मदतही मिळणार आहे. पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत या व्यवसायासाठी कर्ज मिळू शकते. व्यवसायासाठीच्या एकूण रकमेच्या 80 टक्के एवढी रक्कम कर्ज स्वरूपात या योजनेअंतर्गत मिळू शकते. म्हणजेच तुम्ही हा व्यवसाय एक लाख रुपये स्वतः गुंतवून आणि चार लाख रुपये कर्ज स्वरूपात उभारून सुरू करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe