Sugarcane juice : उसाचा रस पिणे कोणाला आवडत नाही. सर्वांनाच आवडतो, उसाचा रस केवळ चवीलाच चांगला नाही तर आरोग्यासाठीही तो खूप चांगला मानला जातो. खरंतर उसाचा रस उन्हाळयात जास्त पिला जातो, पण थंडीत देखील याचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते, अशातच बहुतेकांना प्रश्न पडतो उसाचा रस थंडीत पिणे योग्य आहे का? तर आजच्या या लेखात आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत.
खरं तर उसाचा रस हिवाळ्यात पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात उसाचा रस खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते. तसेच इतरही अनेक फायदे मिळतात, चला त्या फायद्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
हिवाळ्यात उसाचा रस पिण्याचे फायदे :-
-हिवाळ्यात उसाचा रस पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. उसाचा रस थंड वातावरणात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो. थंडीत लोक कमी प्रमाणात पाणी पितात. अशा स्थितीत शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. अशा परिस्थितीत उसाचा रस पिऊन शरीर हायड्रेट ठेवता येते.
-उसाचा रस हा मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोहाचा चांगला स्रोत मानला जातो. उसाचा रस पिऊन तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. त्यात आवश्यक खनिजे देखील असतात.
-रोगप्रतिकारशक्तीसोबतच उसाच्या रसामुळे हाडेही मजबूत होतात. ज्यांची हाडे कमकुवत आहेत त्यांच्यासाठी उसाचा रस पिणे फायदेशीर आहे.
-उसाचा रस पिऊन तुम्ही तुमचा ताण नियंत्रित करू शकता. उसाचा रस प्यायल्याने झोपही सुधारते.
-उसाचा रस पचनसंस्थेसाठीही चांगला मानला जातो. यामध्ये असलेले फायबरचे प्रमाण बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या कमी करण्यासाठी तसेच पोट निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. हे प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहते.
-उसाचा रस मूत्रपिंड आणि यकृताच्या कार्याला चालना देण्यासाठी आणि UTI संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. उसाचा रस तुमचे यकृत मजबूत करण्यास मदत करू शकतो.
-काविळीच्या रुग्णांसाठीही उसाचा रस चांगला मानला जातो. काविळीवर ऊस हा एक उत्तम उपाय आहे. उसाचा रस प्यायल्याने कावीळ बरी होते.