अलीकडे सार्वजनिक ठिकाणी फ्री मध्ये Wi-fi ची सुविधा देण्यात असते अनेकदा आपण ह्याचा वापर करतो पण याचे दुष्परिणाम आपल्याला माहितच नसतात चला तर आज जाणून घेवू ह्या बद्दल थोडक्यात माहिती.
फ्री वाय-फायचा वापर केल्यास डिजिटल व्हायरस सहजपणे आपल्या स्मार्टफोनमध्ये येवू शकतात.

Image By CIO.com
पैशाचे ऑनलाईन शॉपिंग व्यवहार करताना बँकेशी कनेक्ट केले जाते अशावेळी हॅकर आपली माहिती चोरून चुकीचे व्यवहार होण्याची ही शक्यता असते.
हॅकर्स अनेकदा फेक नावाने वाय-फाय नेटवर्क तयार करतात. मात्र अशापद्धतीने कनेक्ट केल्यास डेटा चोरीला जावू शकतो.
फोन आणि लॅपटॉपमध्ये Antivirus ठेवा. यामुळे महत्त्वाची माहिती सुरक्षित राहण्यास मदत होते.
महत्त्वाच्या कामामुळे अनेकदा फ्री वाय-फायचा केला जातो अशा वेळी प्रोव्हायडरची ऑथेंटिसिटी चेक करूनच त्याचा वापर करा.