Mangal Gochar 2024 : वैदिक ज्योतिषात नऊ ग्रहांमध्ये मंगळाला विशेष स्थान आहे. मंगळ हा ग्रहांचा सेनापती ग्रह मानला जातो. मंगळ दर 45 दिवसांनी आपला मार्ग बदलतो आणि सर्व 12 राशींच्या जीवनावर परिणाम करतो. एप्रिलमध्ये, मंगळ मीन राशीत प्रवेश करेल. जो काही राशींसाठी खूप खास असेल, मंगळाच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होईल पाहुयात…
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी मीन राशीत मंगळाचे संक्रमण उत्पन्नाचे स्त्रोत वाढवेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ उत्तम राहील. वडिलांशी तुमचे संबंध चांगले राहतील.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळाच्या राशीतील बदल देखील शुभ राहील. तुमची लपलेली कौशल्ये आणि क्षमता जगासमोर येतील. नोकरीत तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो. वैवाहिक जीवनही आनंदी राहील. पती-पत्नीमध्ये समन्वय वाढेल. प्रेमसंबंधांसाठीही हा काळ उत्तम राहील.
धनु
मीन राशीतील मंगळाचे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. ज्ञान आणि शोधाची उत्सुकता वाढेल. प्रवास आणि उच्च शिक्षणाची शक्यता आहे. अध्यात्माकडे कल वाढेल.
मिथुन
एप्रिलमध्ये मिथुन राशीच्या लोकांवरही मंगळ कृपा करेल. या काळात तुमचे संवाद कौशल्य चांगले असेल. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. नवीन कामाची सुरुवात करून यश मिळू शकते. तुमच्या बंधू-भगिनींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरित करा. चांगले फळ मिळेल.