Facts About Biryani : भाताच्या विविध प्रकारात बिर्याणी हा प्रकार सर्व भारतभर व सर्व समाजांत लोकप्रिय आहे. बिर्याणीचे नाव काढताच जिभेवर पाणी येते. बिर्याणी ही केवळ जिभेला चव देत नाही, तर आरोग्यासाठी ती फायदेशीर समजली जाते. भारतात बिर्याणी बनविण्याची इतकी विविधता आहे की, प्रत्येक राज्यात त्याची चव वेगळी असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आज आपण जी बिर्याणी खातो ती कुठून आली? बिर्याणी हा भारतीय पदार्थ आहे की परदेशी पदार्थ आहे? याच प्रश्नाची उत्तरे आपण शोधूयात…
काय आहे बिर्याणीचा इतिहास?
भारतात बिर्याणी दोन प्रकारे केली जाते एक असते ती व्हेज आणि दुसरी असते ती नाँनव्हेज. नाँनव्हेज बिर्याणीत भात आणि मांस एकत्र शिजवून खाल्ले जाते. नाँनव्हेज बिर्याणीच्या इतिहासाबद्दल बोलायचे असेल तर हा अस्सल भारतीय पदार्थ आहे. मौर्य आणि गुप्त काळात भात आणि मांस एकत्र शिजवले जात होते.

त्याचे पुरावेही आहेत.दक्षिण भारतातही अनेक ठिकाणी भात आणि मांस एकत्र शिजवून खाल्ले जात असे. परंतु खरं पाहिलं तर, बिर्याणीचा इतिहास मुघल आणि तुर्कांशी जोडलेला आहे.
भारतीय बिर्याणी ही मुघल आणि तुर्क लोक ज्याला बिर्याणी म्हणत असत त्यापेक्षा खूप वेगळा आहे. तिचे पूर्णपणे भारतीयीकरण झाले. बिर्याणीचे पौष्टिकता आणि चव यामुळे ती सर्वांची आवडती बनली आहे.
पुलाव म्हणजे काय?
तळलेले किंवा भाजलेल्या पदार्थाला बिर्याण म्हणतात. बिर्याण हा पार्शियन शब्द आहे आणि त्यापासून बिर्याणी हा शब्द तयार झाला. जेव्हा मुस्लिम शासकांनी भारतावर आपले राज्य स्थापन केले, तेव्हा त्यांनी खाल्लेले पदार्थ देखील प्रसिद्ध झाले.
त्यापैकी एक बिर्याणी होती. पण दिल्लीच्या सुलतानाच्या काळात, मांस आणि भात एकत्र शिजवून बनवलेला पदार्थ प्रत्यक्षात बिर्याणी नव्हता. त्याला पुलाव असे म्हणत होते. मुघलांनी बिर्याणी लोकप्रिय केली. ज्याची तयारी प्रक्रिया खूप वेगळी होती आणि हेच ती पुलावपेक्षा वेगळी आणि खास बनवते.
आजची बिर्याणी वेगळी
मुघल काळात बनवलेल्या बिर्याणीत काळी मिरी आणि लाल मिरचीचा वापर कमी होता. आजकाल जी बिर्याणी बनविली जाते ती चवीला तिखट असते. बिर्याणी भारतीय आहाराचा एक भाग बनली. वेगवेगळ्या राज्यात तिचे स्वरूप बदलले.
हैदराबादी बिर्याणी, लखनऊ बिर्याणी, कोलकाता बिर्याणी सध्या खूप लोकप्रिय आहेत. हैदराबादी बिर्याणीमध्ये जास्त मसाले असतात. लखनौ बिर्याणीची शैली शाही आहे. कोलकात्याची बिर्याणी बंगाली पद्धतीची आहे.
त्यात बटाटे आणि साखर दोन्ही वापरले जातात. बिर्याणी ही भात आणि मांसाचे थर घालून बनवली जाते, एवढेच काय ते सर्व राज्यात काँमन असते. परंतु तिची चव प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते. मांस, भात एकत्र शिजवल्यानंतर त्यात सुगंधी मसाले, बासमती तांदूळ घालून बिर्याणी तयार होते.