साडेसहा लाख रुपयांच्या बजेटमध्ये ‘ही’ आहे बेस्ट सेव्हन सीटर कार, पहा या गाडीचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Ahmednagarlive24 office
Published:

7 Seater Car : भारतात सेव्हन सीटर कारला मोठी मागणी आहे. मोठ्या परिवारांमध्ये सेव्हन सीटर कारला मोठी डिमांड असते. जर तुम्हीही नवीन 7 सीटर कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे.

कारण की आज आपण भारतात साडेसहा लाख रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध असणाऱ्या एका भन्नाट 7 सीटर MPV गाडीची माहिती जाणून घेणार आहोत.

खरंतर भारतीय बाजारात मारुती सुझुकी या देशातील सर्वाधिक लोकप्रिय कंपनीची मारुती एर्टिगा ही कार MPV सेगमेंट मध्ये एक लोकप्रिय सेव्हन सीटर कार आहे. या गाडीची लोकप्रियता एवढी अधिक आहे की आता या गाडीने विक्रीचे सारे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

नुकत्याच या गाडीचे दहा लाख युनिट विक्री झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आज आपण देशात उपलब्ध असलेल्या स्वस्तातल्या सेव्हन सीटर रेनॉल्ट Triber या गाडीची माहिती जाणून घेणार आहोत. ही गाडी किमतीच्या बाबतीत एर्टिगा पेक्षा स्वस्त आहे. यामुळे जर तुम्हाला स्वस्तात कार खरेदी करायची असेल तर या गाडीचा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे.

गाडीचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन :- रेनॉल्ट ट्रायबर ही भारतातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार आहे. जर तुम्हाला स्वस्तात 7 सीटर कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन राहणार आहे.

ही कंपनीची एक हॉट सेलिंग कार आहे. ग्राहकांमध्ये या कारचा मोठा बोलबाला आहे. परंतु विक्रीच्या बाबतीत ही कार एर्टिगाच्या मागे आहे. Renault Triber या गाडीच्या इंजिन बाबत बोलायचं झालं तर यामध्ये 1.0 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

हे इंजिन 71bhp ची कमाल पॉवर आणि 96Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि AMT सह जोडले गेले आहे.

गाडीचे मायलेज आणि किंमत :- कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ट्रायबर ही कार 18 ते 19 kmpl मायलेज देत आहे. अर्थातच या सेगमेंटमध्ये या गाडीचे मायलेज चांगले आहे.

दुसरीकडे या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर Renault Triber ची एक्स-शोरूम किंमत 6.33 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलमध्ये 8.97 लाख रुपयांपर्यंत जाते. अर्थातच ज्यांचा बजेट साडेसहा लाख रुपयांपर्यंत असेल त्यांच्यासाठी ही कार बेस्ट ठरणार आहे.

गाडीचे फीचर्स आहेत भन्नाट :- या गाडीचे सेफ्टी फीचर्स आणि इंटेरियर देखील खूपच खास आहे. या गाडीमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणारी 8-इंचाची टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळते.

याशिवाय कारच्या केबिनमध्ये 7-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि वायरलेस चार्जर सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. त्याचवेळी, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेत एक एसी व्हेंट, पुश बटण स्टार्ट-स्टॉप आणि सेंटर कन्सोलमध्ये कूल्ड स्टोरेज यांसारखे फीचर्स या कार मध्ये पाहायला मिळतात.

या कारमध्ये मागील पार्किंग सेन्सरसह 4 एअरबॅग देण्यात आल्या आहेत. यामुळे ही कार कंपनीची एक बेस्ट सेफ्टी फीचर कार म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe