Astronomy Facts : शास्त्रज्ञांना चंद्रानंतर इतर कोणत्याही खगोलीय पिंडात रस असेल तर तो मंगळ आहे. नव्या संशोधनातून असे संकेत मिळाले आहेत की, मंगळावर एकेकाळी पृथ्वीसारखे वातावरण होते.
या संशोधनातून असे संकेत मिळाले आहेत की, कधीकाळी मंगळ या ग्रहावरही पृथ्वीप्रमाणेचे ऋतुचक्र चालत होते. हा काळ सुमारे तीन अब्ज वर्षांपूर्वीचा असावा, असे अनुमान संशोधकांनी लावले आहे.

शास्त्रज्ञांचा असा कयास आहे की मंगळ ग्रहावर कोरड्या आणि ओलसर हवामानाने जटिल प्राचीन सेंद्रिय संयुगे तयार -करण्यासाठी आदर्श परिस्थिती निर्माण केली असावी, जी जीवनाची पूर्वसुरी म्हणून काम करते.
पृथ्वीच्या विपरीत मंगळावर अब्जावधी वर्षे जुन्या जीवाश्म नद्या आणि तलावांचे चांगले जतन केलेले प्रदेश आहेत, असे संशोधकांनी सांगितले. पृथ्वी हा एक गतिमान ग्रह आहे, जिथे टेक्टोनिक प्लेट्स अस्तित्वात आहेत, खडकाचे मोठे स्तर जे पृथ्वीचे कवच विभाजित करतात आणि सतत फिरत असतात.
या संशोधनातून असेही आढळून आले आहे की, मंगळावर एकेकाळी द्रवरूपात पाणी अस्तित्वात होते. पाणी ही जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे. मात्र अब्जावधी वर्षांच्या कालावधीत मंगळ ग्रहाने वातावरण गमावले. आता हा ग्रह गोठलेल्या बर्फाच्या स्वरूपात आहे, जिथे जीवसृष्टी निर्माण होणे अशक्य आहे.
अमेरिका, चीन, रशिया आणि फ्रान्स यांसारख्या देशांनी मंगळ ग्रहावर संशोधन करण्यासाठी अनेक मोहिमा आखल्या आहेत. आता तर मंगळावर पोहोचण्यासाठी चंद्राचा ‘लाँचिंग पॅड’ म्हणून उपयोग करण्याचा विचार सुरू आहे.
कारण चंद्राच्या तुलनेत मंगळ पृथ्वीपासून खूप दूर आहे, त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे सोपे नाही. पृथ्वी आणि मंगळातील अंतर ३६३.३४ दशलक्ष किलोमीटर एवढे आहे.