Marathi News : येत्या काही दिवसातच शारदीय नवरात्रोत्सवाची सुरवात होईल. हिंदू दिनदर्शिकेनुसार शारदीय नवरात्रीची सुरुवात आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून होते. यावर्षी नवरात्र 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होईल आणि 24 ऑक्टोबर 2023 रोजी संपेल.
नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची नवरात्री खूप खास आहे कारण अनके प्रकारचे राजयोग तयार होणार आहेत.
![Marathi News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/10/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-2023-10-06T145748.126.jpg)
30 वर्षांनंतर शनी स्वराशित अर्थात कुंभ राशीत विराजमान होतील. यासोबतच बुध आणि सूर्य कन्या राशीत असल्याने बुधादित्य योग तयार होत आहे. यासोबतच बुध आपल्या स्वराशीत असल्याने भद्रा राजयोग आणि शनी आपल्याच राशीत असल्याने शश राजयोग तयार होत आहे.
अशापरिस्थितीत शारदीय नवरात्र काही लोकांसाठी खूप खास असणार आहे. या लोकांना संपत्तीबरोबरच समाजात मान-सन्मान मिळेल. कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत कराल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी शारदीय नवरात्र उत्तम राहील.
वृषभ
बुधादित्य योग, भद्रा राजयोग निर्मितीमुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. दुर्गा देवीचा अपार आशीर्वाद मिळेल. प्रलंबित कामे सुरळीत सुरू होऊ शकतील. कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत करा. कुटुंबासमवेत धार्मिक सहलीला जाऊ शकता.
कामाच्या ठिकाणाबद्दल बोलायचं तर तुमचं काम आणि मेहनत लक्षात घेता तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. व्यावसायिकांना मोठा नफा ही मिळू शकतो. कुटुंबात सुख-शांती राहील. दुर्गा मातेच्या कृपेने उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील.
मकर
हा राजयोग या राशीच्या लोकांसाठी समृद्धी देखील आणू शकतो. दुर्गा देवीचा अपार आशीर्वाद मिळेल. शारदीय नवरात्रीत वाहन आणि मालमत्ता खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल.
त्यामुळे पदोन्नती मिळण्याची शक्यता अधिक आहे. व्यवसायात अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आर्थिक परिस्थिती सुधारल्याने संपत्तीत वाढ होईल.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी नवरात्री खूप चांगली असणार आहे. भद्रा आणि बुधादित्य सह शश राजयोग निर्माण झाल्यामुळे या राशीच्या लोकांना आंबे मातेचा विशेष आशीर्वाद मिळेल. अशावेळी मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत कराल. अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे परत मिळू शकतात. कायदेशीर बाबींमध्येही यश मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. दांपत्य जीवनात आनंदी वातावरण राहील.